शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

एकेकाळच्या मुंबई प्रांतातील बेटासाठी येमेन-युएईची लढाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2018 16:55 IST

मुंबई प्रांताचे गव्हर्नर या बेटाचे कामकाज पाहात असत. आता सगळ्या जगाचा या बेटावर डोळा आहे.

सना- यादवी युद्धामुळे गेली अनेक वर्षे अस्वस्थता असलेल्या येमेन आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यामध्ये काही दिवस लढाई सुरु आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या सैन्याने येमेनचा ताबा असणाऱ्या सोकोत्रा बेटावर ताबा मिळवल्याने दोन्ही देशांमध्ये तणाव वाढीस लागला होता. सोकोत्रा हे बेट एकेकाळी मुंबई प्रांतामध्ये होते. ब्रिटिशांची सत्ता एडनसह इतर अनेक ठिकाणी होती. अरबी समुद्रामध्ये एडन आणि सोकोत्रा यांना विशेष स्थान होते. सोकोत्रा आणि काही इतर बेटांचा समूह येमेनच्या जवळच आहे. सोकोत्रावर आढळणाऱ्या विशिष्ट झाडांमुळे ते बेट जगप्रसिद्ध आहे. ही झाडे इतरत्र कोठेही आढळत नाहीत. हे बेट अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी असल्यामुळे जगातील अनेक देशांचे या बेटावर लक्ष असते.संयुक्त अरब अमिरातीने सोकोत्रावर पाय ठेवले असले तरी येमेनचे पंतप्रधान अहमद बिन दागर यांनी लढाई संपल्याचे घोषित केले आहे. सोकोत्रा या बेटाला युनेस्कोने जागतिक वारसास्थळाचा दर्जाही दिला आहे. मे महिन्याच्या सुरुवातील सोकोत्रावर संयुक्त अरब अमिरातीने 300 सैनिकांना पाठवले तसेच रणगाडेही बेटावर पाठवलेय मात्र सोकोत्राच्या रहिवाश्यांनी याला तीव्र विरोध केला. सोकोत्राचे गव्हर्नर हाशिम साद अल- साकात्री यांनी संयुक्त अरब अमिरातीच्या या निर्णयाचा निषेध केला आणि हा हल्ला म्हणजे येमेनच्या सार्वभौमत्त्वावर हल्ला आहे असे त्यांनी मत व्यक्त केले. इतके दिवस येमेन युद्धामध्ये सोकोत्रा दूर असल्यामुळे ओढले गेले नव्हते मात्र युएईच्या हल्ल्यामुळे सोकोत्रालाही फरफटत नेण्यात आले. 

युएईने सी-17 विमानांच्या मदतीने 2 बीएमपी-3 रणगाडे, शस्त्रास्त्रे असणारी वाहने आणि 100 फौजा तेथे उतरवल्या, दोन वर्षांपुर्वीत सोकोत्रावर लष्करी तळही उभारण्यात आला होता. या सर्व कृतीचे युएईचे  परराष्ट्रमंत्री अन्वर गर्गश यांनी केले होते, आमचे सोकोत्राच्या नागरिकांशी ऐतिहासिक व कौटुंबिक संबंध आहेत असे विधान करुन हे संबंध पुन्हा एकदा प्रस्थापित करत आहोत असे युएईच्या कृतीचे समर्थन त्यांनी केले होते.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयIndiaभारत