शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

२६/११ नंतर मनमोहन सिंगांनी पाकविरोधात कारवाई करण्यास टाळटाळ केली; ओबामांचा दावा

By कुणाल गवाणकर | Updated: November 17, 2020 22:16 IST

ओबामांच्या पुस्तकामुळे भारतात राजकारण तापलं

वॉशिंग्टन: अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या नव्या पुस्तकामुळे भारतातील राजकारण तापू लागलं आहे. मुंबईवरील २६/११ हल्ल्यानंतर विद्यमान पंतप्रधान मनमोहन सिंगपाकिस्तानविरोधात कारवाई करण्यास टाळाटाळ करत होते, असा दावा ओबामांनी पुस्तकात केला आहे. मनमोहन सिंग यांना त्यांच्या धोरणाचे राजकीय परिणाम भोगावे लागले, असंदेखील ओबामांनी पुस्तकात नमूद केलं आहे.ओबामांनी त्यांच्या A promised land पुस्तकात भारतातल्या अनेक राजकीय घटना आणि पडद्यामागे घडलेल्या घडामोडींचा उल्लेख केला आहे. 'देशातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या प्रभावामुळे मुस्लिम विरोधी भावना वाढत असल्याची भीती त्यांना (मनमोहन सिंग यांना) वाटत होती,' असं ओबामांनी पुस्तकात म्हटलं आहे. 'राजकीय पक्षांमधील कटुता, विविध फुटिरतावादी आंदोलनं, भ्रष्टाचार, घोटाळे असूनही आधुनिक भारताची कहाणी बरीच सफल झाली,' असं ओबामांनी पुस्तकात नमूद केलं आहे....म्हणून सोनिया गांधींनी मनमोहन सिंगांना बनवलं होतं पंतप्रधान; बराक ओबामांनी सांगितली मोठी गोष्ट!जागतिकीकरण आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा विस्तार यावर ओबामांनी पुस्तकातून प्रकाश टाकला आहे. '१९९० च्या दशकात भारतीय अर्थव्यवस्था आणखी बाजार केंद्रीत झाली. त्यामुळे भारतीयांची असामान्य उद्यमशीलता, कौशल्यं समोर आली. विकासदर वाढीस लागला. तंत्रज्ञान क्षेत्र विस्तारलं. याचा थेट फायदा मध्यमवर्गाला झाला,' असं निरीक्षण ओबामांनी पुस्तकात नोंदवलं आहे.राहुल गांधी यांचे वर्तन उतावीळ विद्यार्थ्यासारखे- बराक ओबामा२००८ पासूनचा निवडणूक प्रचार ते अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून पहिला कार्यकाळ संपेपर्यंत घडलेल्या घटनांचा उल्लेख ओबामांनी पुस्तकात केला आहे. अलकायदा प्रमुख ओसामा बिन लादेनचा खात्मा करण्यासाठी केलेल्या कारवाईची माहितीदेखील पुस्तकात आहे. ओबामांच्या पुस्तकाचे २ भाग आहेत. यातील पहिला भाग मंगळवारी जगभरात प्रसिद्ध झाला. डॉ. मनमोहनसिंग अतिशय प्रामाणिक, ओबामांच्या पुस्तकातील 'मन की बात'आर्थिक सुधारणांसाठी मनमोहन सिंग यांचं कौतुकबराक ओबामांनी त्यांच्या पुस्तकात मनमोहन सिंग यांच्या आर्थिक धोरणांचं कौतुक केलं आहे. 'भारतीय अर्थव्यवस्थेत झालेल्या बदलांमध्ये मनमोहन सिंग यांची भूमिका निर्णायक होती. अल्पसंख्यांक शीख समुदायात जन्मलेले मनमोहन सिंग देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचले. त्यांनी आपल्या आयुष्यात अतिशय उच्च मापदंड निर्माण केले. आपली भ्रष्टाचारमुक्त प्रतिमा निर्माण करून त्यांनी लोकांची मनं जिंकली,' अशी स्तुतीसुमनं ओबामांनी मनमोहन यांच्यावर उधळली आहेत.

टॅग्स :Manmohan Singhमनमोहन सिंग26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानBJPभाजपा