शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधी कमावणाऱ्या 'त्या' अधिकाऱ्याने कॅन्टीनमधून सॅन्डविच चोरी केलं त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 15:13 IST

पारस शहा याच्या लिंक इन प्रोफाइलनुसार त्याला सुरक्षा, व्यापार आणि रिस्क मॅनजेमेंटचा अनुभव आहे.

लंडन - पैसे किंवा गाडी चोरीच्या घटना आपण अनेकदा ऐकल्या असतील पण लंडनमध्ये एक अनोखा प्रकार समोर आल्याचं पाहायला मिळालं आहे. ऑफिसच्या कॅन्टीनमधून सँडविच चोरुन नेल्याप्रकरणी एका उच्चस्तरीय बँकरला कंपनीने निलंबित केले आहे. ३१ वर्षीय पारस शहा याला वर्षाकाठी ९ कोटी रुपये पगार मिळतो. युरोप, मध्य पूर्व आणि आफ्रिका या शहरांच्या प्रमुखपदावरून शहाला कंपनीने काढून टाकले आहे. 

फायनान्शियल टाईम्सच्या अहवालानुसार, बँकेने अनेक आरोपानंतर पारसला निलंबित केले, त्यातील एक ऑफिसच्या कॅन्टीनमधून अन्न चोरत होता. परंतु, पारसने कॅन्टीनमधून किती सँडविच चोरले याबाबतची माहिती अद्याप समोर आली नाही. 

पारस शहा हा युरोपमधील सर्वात मोठा क्रेडिट व्यापाऱ्यांपैकी एक आहे. ग्लासडोर या कर्मचाऱ्यांसंबधित वेबसाईटनुसार सर्वसाधारणपणे, युरोपमधील एका क्रेडिट व्यापाराचे वेतन 183,740 पौंड (सुमारे 1 कोटी रुपये) किंवा त्याहून अधिक असते, परंतु पारस शहाचा पगार यापेक्षा जास्त होता कारण तो सिटी बँकेत होता. उच्च पदाच्या पदावर कार्यरत होता. डेली मेलच्या अहवालानुसार एका बँकेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, इतर बँकांमध्ये या पदावर अधिकाऱ्यांना दहा लाख पौंड (सुमारे 9 कोटी रुपये) पर्यंत पगार मिळतो.

पारस शहा याच्या लिंक इन प्रोफाइलनुसार त्याला सुरक्षा, व्यापार आणि रिस्क मॅनजेमेंटचा अनुभव आहे. पारस शहा यानी २०१० साली बाथ विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पदवी संपादन केली. यानंतर, त्याने एचएसबी बँकेत 7 वर्षे काम केले आणि 2017 मध्ये त्यांनी सिटी बँकेत काम करण्यास सुरवात केली. सिटीबँकमध्ये नोकरी लागल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांनी पारस शहाला युरोप, मध्य पूर्व आणि आफ्रिका येथे हाय-यील्ड क्रेडिट ट्रेनिंगचा प्रमुख बनविण्यात आले. 

टॅग्स :theftचोरीbankबँक