शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

इकडे भाषण अन् तिकडे वडिलांचे घर खाक...! शेख हसीना भडकल्या, युनूस सरकारला दिली थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 11:08 IST

Bangladesh Violence: महत्वाचे म्हणजे, बांगलादेशच्या स्वातंत्र्यानंतर काही वर्षांनीच शेख मुजीबुर रहमान यांचे निधन झाले होते. १९७५ साली त्यांची हत्या झाली होती. यानंतर, ढाका येथील त्यांच्या निवासस्थानाचे स्मारक संग्रहालयात रूपांतर करण्यात आले होते.

बांगलादेशात बुथवारी एक मोठी आणि धक्कादायक घटना घडली आहे. येथे निदर्शकांच्या एका मोठ्या टोळक्याने, बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांच्या ढाक्यातील घरात मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली आणि नंतर या घराला आग लावली. महत्वाचे म्हणजे, त्यांची (मुजीबुर रहमान) मुलगी तथा पदच्युत पंतप्रधान शेख हसीना लोकांना 'ऑनलाइन' संबोधित करत असताना ही घटना घडली.

शेख हसीना या बुधवारी रात्री ९ वाजता ऑनलाइन भाषण देणार आहेत, अशी माहिती बांगलादेशात मिळाल्यानंतर, शेख हसीना यांच्या विरोधातील गट सक्रिय झाला. यानंतर, हसीना यांच्या भाषणाविरोधात सोशल मीडियावर 'बुलडोझर रॅली'चे आवाहन करण्यात आले. यानंतर, सायंकाळपासूनच राजधानीतील धानमंडी भागात असलेल्या शेख मुजीबुर रहमान यांच्या घरासमोर हजारो लोक जमले होते. त्यांनी बरोबर हसीना यांच्या भाषणाच्या आधीच, या घरात तोडफोड आणि जाळपोळ सुरू केली. महत्वाचे म्हणजे, बांगलादेशच्या स्वातंत्र्यानंतर काही वर्षांनीच शेख मुजीबुर रहमान यांचे निधन झाले होते. १९७५ साली त्यांची हत्या झाली होती. यानंतर, ढाका येथील त्यांच्या निवासस्थानाचे स्मारक संग्रहालयात रूपांतर करण्यात आले होते.

"मी तुमच्यासाठी काहीच केलं नाही का?" -अवामी लीगची विसर्जित विद्यार्थी संघटना 'छात्र लीग'ने शेख हसीना यांच्या या भाषणाचे आयोजित केले होते. माजी पंतप्रधान हसिना यांना भाषणापूर्वीच, त्यांच्या वडिलांच्या घराची तोडफोड आणि जाळपोळ झाल्याची माहिती मिळाली होती. यामुळे त्या प्रचंड भडकलेल्या दिसल्या. त्या म्हणाल्या, "मी तुमच्यासाठी काहीच केले नाही का? मी काम केले नाही का? मग माझ्या वडिलांनी स्वातंत्र्याचा नारा ज्या घरातून दिला, त्याची तोडफोड का करण्यात आली? मला न्याय हवा आहे."

"इतिहास बदला घेत असतो" -शेख हसीना यांनी आपल्या संबोधना देशवासीयांना सध्याच्या राजवटीविरुद्ध संघटित शक्तीने प्रतिकार करण्याचे आवाहन केले. बांगलादेशातील मुहम्मद युनूस यांच्या सध्याच्या सरकारसंदर्भात बोलताना हसीना म्हणाल्या, "त्यांच्यात अद्यापही एवढी ताकद नाही की ते, जो राष्ट्रध्वज, जे संविधान आणि जे स्वातंत्र्य, लाखो हुतात्म्यांच्या बलिदानाने मिळाले आहे, ते बुलडोझरच्या सहाय्याने नष्ट करू शकतील. ते इमारत उद्धवस्त करू शकतात, मात्र, इतिहास नाही. इतिहास सूड घेत असतो, हे त्यांनी लक्षात ठेवावे." 

टॅग्स :Bangladeshबांगलादेशfireआग