शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 18:28 IST

Bangladesh Violence: 18 डिसेंबर रोजी बांगलादेशात एका हिंदू तरुणाला झाडाला लटकवून जाळल्याची धक्कादायक घटना घडली.

Bangladesh Violence: बांगलादेशच्या मयमनसिंह जिल्ह्यातील हिंदू युवक दीपू चंद्र दास याची जमावाने अमानुषपणे हत्या करून मृतदेह झाडाला बांधून जाळल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेचे व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाले. या प्रकरणाच्या तपासात आता नवीन आणि महत्त्वाचा खुलासा झाला आहे. सुरुवातीला ही हत्या पैगंबर मोहम्मद यांच्याविरोधात कथित अपशब्द (ईशनिंदा) बोलल्यामुळे झाल्याचे सांगितले जात होते; मात्र पोलीस आणि रॅपिड अ‍ॅक्शन बटालियन यांच्या तपासात या आरोपांना कोणताही ठोस पुरावा आढळलेला नाही.

खरे कारण काय 

मीडिया रिपोर्ट्समध्ये बांगलादेशी तपास यंत्रणांच्या हवाल्याने सांगितले जात आहे की, दीपू दास यांच्या हत्येमागे कारखान्यातील अंतर्गत वाद, प्रोडक्शन टार्गेट, ओव्हरटाइम आणि अलिकडील प्रमोशन परीक्षेमुळे निर्माण झालेली वैरभावना कारणीभूत ठरली.

फॅक्टरीतील संघर्षातून जमावाच्या ताब्यात

ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, 27 वर्षीय दीपू चंद्र दास हे पायनियर निटवेयर्स लिमिटेड या गारमेंट फॅक्टरीत फ्लोअर मॅनेजर म्हणून कार्यरत होते. त्यांनी नुकतीच सुपरवायझर पदासाठीची प्रमोशन परीक्षा दिली होती. फॅक्टरीचे वरिष्ठ व्यवस्थापक साकिब महमूद याने सांगितले की, दुपारी सुमारे 5 वाजता काही कामगारांनी दीपूवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत फॅक्टरीत गोंधळ घातला. दीपू यांचे भाऊ अपु चंद्र दास यांनी सांगितले की, कामाच्या अटी, टार्गेट्स आणि कामगारांच्या लाभांवरून दीपू यांचे काही सहकाऱ्यांशी आधीपासून वाद सुरू होते.

18 डिसेंबर 2025 रोजी वाद वाढल्यानंतर फ्लोअर-इन-चार्जने दीपू यांना जबरदस्तीने राजीनामा द्यायला लावला आणि फॅक्टरीबाहेर काढून संतप्त जमावाच्या ताब्यात दिले.

मारहाण करून हत्या, मृतदेह जाळला

पोलीस माहितीनुसार, फॅक्टरीपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर महामार्गाजवळ दीपू यांना बेदम मारहाण करण्यात आली. मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह झाडाला बांधून केरोसीन ओतून पेटवण्यात आला. या घटनेचे भीषण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. 

तपास अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले की, ईशनिंदेचे आरोप फक्त तोंडी आहेत; आतापर्यंत कोणताही पुरावा मिळालेला नाही. कोणीही दीपूला धर्माविरोधात काही बोलताना ऐकले नाही; सोशल मीडियावरही कोणती पोस्ट नाही. ही घटना धार्मिक संतापातून नव्हे, तर नियोजनपूर्वक घडल्याचे दिसते.

12 जणांना अटक

या प्रकरणात आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांत फॅक्टरीचे फ्लोअर मॅनेजर आलमगीर हुसेन, क्वालिटी इन-चार्ज मिराज हुसेन अकोन आणि अनेक कामगारांचा समावेश आहे. तपास सुरू असून आणखी अटक होण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Bangladesh: Hindu man's murder not blasphemy, factory dispute was cause.

Web Summary : Hindu man Dipu Chandra Das was brutally murdered in Bangladesh. Initial blasphemy claims are false. Factory disputes over production targets and promotion fueled the violence. Twelve arrests were made; the investigation continues.
टॅग्स :BangladeshबांगलादेशCrime Newsगुन्हेगारी