बांगलादेशात अल्पसंख्यक हिंदू आणि हिंदूंच्यामंदिरांवरील हल्ले सातत्याने वाढताना दिसत आहेत. शुक्रवारी रात्री (6 डिसेंबर 2024) ढाक्यातील आणखी एका हिंदू मंदिरावर कट्टरवाद्यांनी हल्ला केल्याचे वृत्त आहे. स्थानीय माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कट्टरवाद्यांनी इस्कॉन नमहट्टा मंदिरावर हा हल्लाकेला.
माध्यमांतील वृत्तांनुसार, "सर्वप्रथम मंदिरात तोडफोड करण्यात आली. यानंतर, जमावाने देवांच्या मूर्तींना आग लावली. या मंदिराचे व्यवस्थापन इस्कॉन करत होते. याहल्ल्यानंतर, पुन्हा एका हिंदू संघटनांनी आरोप केला आहे की, कट्टरवाद्यांकडून अल्पसंख्यक हिंदूंवर सातत्याने हल्ले होत आहेत आणि मुहम्मद युनूस केवळ मूकदर्शक बनले आहेत.
कोलकाता इस्कॉनच्या उपाध्यक्षांनी केली पुष्टीकोलकाता इस्कॉनचे उपाध्यक्ष राधारमण दास यांनीही या घटनेची पुष्टी केली आहे. यासंदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर त्यानी म्हटले आहे, "मंदिराचे टिनचे छत काढण्यात आले आणि पेट्रोलचा वापर करून आग लावण्यात आली. आठवडाभरापूर्वी, मुस्लीम जमावाने इस्कॉन नमहट्टा केंद्र जबरदस्तीने बंद केले होते. चिन्मय कृष्ण दास प्रभू आणि त्यांच्या सहकाऱ्यांची नुकतीच झालेली अटक, इस्कॉन या हिंदू संघटनेवर बंदी घालण्याचा प्रयत्न आणि देशद्रोहाच्या खटल्यांद्वारे हिंदूंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. हिंदूंवरील अत्याचार सुरूच आहेत."