शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

शेख हसीना यांच्या अडचणीत वाढ; आधी युकेने नकार दिला, आता अमेरिकेने व्हिसा रद्द केला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 19:41 IST

बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी सध्या भारतात आश्रय घेतला आहे.

Bangladesh Sheikh Hasina : बांग्लादेशातील वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन भारतात आश्रय घेतला. सध्या त्या भारतातील हिंडन विमानतळावरील गेस्ट हाऊसमध्ये मुक्कामी आहेत. शेख हसीना काही काळ भारतात राहून लंडनला रवाना होतील, असे सर्वांना वाटले होते, मात्र युकेने त्यांना आश्रय देण्याबाबात अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. तर, दुसरीकडे अमेरिकेने त्यांचा यूएस व्हिसा रद्द केला आहे. म्हणजेच, आता त्यांना अमेरिकेतही जाता येणार नाही.

युकेने काय म्हटले?ब्रिटनच्या गृहविभागाच्या म्हणण्यानुसार, शेख हसीना ज्या देशात आधी पोहचतील, त्या देशाकडे आश्रयासाठी बोलणे केले पाहिजे. सुरक्षेचा हा सर्वात वेगवान मार्ग असल्याचे ब्रिटनचे मत आहे. या कारणास्तव हसना यांची यूकेमध्ये आश्रयाची विनंती अद्याप प्रलंबित आहे. मात्र, हसीना यांची बहीण रेहाना आणि भाची ट्युलिप सिद्दीकी यांच्याकडे युकेचे नागरिकत्व असल्यामुळे त्यांना आश्रय मिळू शकतो. 

अमेरिकेने व्हिसा रद्द केलादरम्यान, शेख हसीना यांच्यासमोर युकेनंतर अमेरिकेला जाण्याचा पर्याय होता, मात्र अमेरिकेने त्यांचा व्हिसा रद्द केला आहे. म्हणजेच, आता अमेरिकेत आश्रय घेण्याचा मार्गही बंद झाला आहे. असे मानले जाते की, त्यांच्या कार्यकाळात बांग्लादेश आणि अमेरिकेतील संबंध चांगले नव्हते, त्यामुळे त्यांचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे. दरम्यान, लंडनला जाण्यासाठी शेख हसीना ब्रिटीश अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहे. यावर काय निर्णय होतो, हे पाहणे महत्वाचे आहे.

शेख हसीना आणखी काही दिवस भारतात राहणार शेख हसीना आणखी काही दिवस भारतात राहणार आहेत. यावर भारत सरकारनेही स्पष्टोक्ती दिली आहे. शेख हसीना यांना भारतात राहायचे असेल, तर राहू शकतात, त्यांनी स्वतः निर्णय घ्यावा. भारत सरकारने त्यांना सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. सध्या भारत सरकार बांग्लादेशचे लष्करप्रमुख आणि इतर सुरक्षा यंत्रणांच्या संपर्कात आहे. भारतीय उच्चायुक्त आणि भारतीयांची सुरक्षा सुनिश्चित करणे ही भारताची प्राथमिकता आहे. याशिवाय भारत सरकारने बांग्लादेशी सुरक्षा दलांना बांगलादेशातील हिंदूंवर होणारे हल्ले रोखण्यास सांगितले आहे.

 

टॅग्स :BangladeshबांगलादेशInternationalआंतरराष्ट्रीयIndiaभारतAmericaअमेरिकाLondonलंडन