शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशात जमावाचा राडा, संगीत कार्यक्रमात दगडफेक; २० जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 11:48 IST

रॉक गायक जेम्सचा कार्यक्रम रद्द, सांस्कृतिक संघटनांच्या कार्यक्रमांना केले जात आहे लक्ष्य...

ढाका : बांगलादेशातील फरिदपूर येथे शुक्रवारी रात्री एका रॉक संगीताच्या कार्यक्रमात जमावाने केलेल्या हल्ल्यात २० विद्यार्थी जखमी झाल्याने प्रसिद्ध रॉक गायक जेम्स यांचा कार्यक्रम रद्द करावा लागला. ‘जेम्स’ या नावाने प्रसिद्ध असलेले बांगलादेशी गायक-गीतकार फारूक महफूज अनम जेम्स यांनी अनेक ‘हिट’ हिंदी चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. अलीकडच्या काळात बांगलादेशातील सांस्कृतिक संघटनांच्या कार्यक्रमांना लक्ष्य केले जात आहे. पोलिसांनी या संदर्भात अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेले नाही. 

जेम्स यांचा हा संगीत कार्यक्रम फरिदपूर जिल्हा शाळेच्या १८५व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित केला होता. स्थानिक वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच काहीजणांना प्रवेश नाकारल्यानंतर गोंधळ माजला. यात जमावाने दगड-विटा फेकून मंचाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. यात शाळेतील विद्यार्थ्यांनी हल्लेखोरांचा प्रतिकार केला; पण दगडफेकीत २० मुले जखमी झाली. नंतर आयोजकांनी कार्यक्रम रद्द केला. 

तारिक रहमान यांची हादीच्या कबरीला भेटबांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीचे काळजीवाहू अध्यक्ष तारिक रहमान यांनी शनिवारी तरुण नेता शरीफ उस्मान हादी याच्या कबरीला भेट देऊन श्रद्धांजली वाहिली. रहमान यांच्या या भेटीवेळी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रहमान यांनी बांगलादेशचे राष्ट्रीय कवी नजरुल इस्लाम यांच्या कबरीलाही भेट देऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली.

कोण आहेत जेम्स : जेम्स हे बांगलादेशी रॉक बँड ‘नगर बाउल’चे मुख्य गायक, गीतकार आणि गिटारवादक आहेत. त्यांनी ‘गँगस्टर’, ‘वो लम्हे’ आणि ‘लाइफ इन अ… मेट्रो’ यांसारख्या अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांत गाणी गायली आहेत.

१७ वर्षांनंतर रहमान पुन्हा मतदारयादीत ढाका : बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे काळजीवाहू अध्यक्ष तारिक अहमद यांनी शनिवारी बांगलादेशच्या मतदार यादीत स्वतःचे नाव नोंदवले. या नोंदीमुळे त्यांना मतदान कार्ड मिळणार आहे. सुमारे १७ वर्षांहून अधिक काळ रहमान हे लंडनमध्ये राहात होते.

शनिवारी सकाळी ते बांगलादेशच्या निवडणूक आयोग कार्यालयात गेले. तेथे त्यांनी बायोमेट्रिक नोंदणी केली. या नोंदीआधी रहमान यांनी मतदारयादीत ऑनलाइन नाव दाखल केले होते.

त्यांना आता २४ तासानंतर मतदान कार्ड मिळेल, असे सूत्रांनी सांगितले. रहमान येणार म्हणून मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Bangladesh: Mob violence disrupts concert; 20 injured in stone pelting.

Web Summary : A rock concert in Bangladesh faced mob violence, injuring 20 students. Rock singer James's show was cancelled after stone pelting during Faridpur school event. Separately, BNP leader Tariq Rahman visited a leader's tomb and enrolled in voter list after 17 years.
टॅग्स :BangladeshबांगलादेशMuslimमुस्लीम