शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

मोहम्मद यूनुस यांचा बुरखा फाटला, खरा रंग समोर आला; आता बांगलादेशच्या संविधानातून 'धर्मनिरपेक्ष' शब्द हटणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 08:47 IST

प्रस्तावात आणखी काय...? काय परिणाम होणार...?

सध्या बांगलादेशात बऱ्याच घटना घडामोडी घडताना दिसत आहेत. आता तेथे संविधान सुधारणा आयोगाने बुधवारी अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद यूनुस यांच्याकडे आपला अहवाल सादर केला आहे. या अहवालात देशाची तीन मूलभूत तत्त्वे अर्थात 'धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि राष्ट्रवाद' ही काढून टाकण्याची शिफारस करण्यात आली आहे. या प्रस्तावामुळे बांगलादेश आणि भारतातही चिंता वाढली आहे. कारण हे सिद्धांत १९७१ च्या मुक्ती युद्धाच्या मूलभूत आदर्शांचा एक भाग आहेत.

बांगलादेशात विद्यार्थ्यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनानंतर तेथील तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागले. यानंतर तेथे आलेल्या नव्या प्रशासनाने संविधान सुधारणा आयोगाची स्थापना केली. या आयोगाने समता, मानव सन्मान, सामाजिक न्याय, बहुलवाद आणि लोकशाही हे 5 नवे राज्य सिद्धांत प्रस्तावित केले आहेत. यात गेल्या सिद्धांतांपैकी केवळ 'लोकशाही' हाच सिद्धांत कायम ठेवण्यात आला आहे.

दोन सभागृहांच्या संसदेचा प्रस्ताव -संविधान सुधारणा आयोगाने देशात दोन सभागृहाच्या संसदेची शिफारस करण्यात आली आहे. यात नॅशनल असेंबली आणि सीनेट, अशी दोन सभागृहे असतील. तसेच, खालच्या सभागृहात 400 तर वरच्या सभागृहात 105 जागा असतील. याशिवाय दोन्ही सभागृहांचा कार्यकाळ 5 वर्षांवरून 4 वर्ष करण्यात यावा, अशी शिफारसही आयोगाकडून करण्या आली आहे.

धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे दोन शब्द हटवल्यास काय परिणाम होईल?धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे दोन शब्द हटवण्याच्या प्रस्तावावरून सध्या बांगलादेशात जबरदस्त चर्चा सुरू आहे. हे सिद्धांत बांगलादेशचे स्वातंत्र्य आणि सामाजिक संरचनेचे आधारभूत स्तंभ मानले जातात. हे शब्द वगळल्यास देशाच्या धर्मनिरपेक्ष संरचनेवर आणि सामाजिक न्यायाच्या बाबतीत मोठा परिणाम  होऊ शकतो. खरे तर या प्रस्तावामुळे मोहम्मद यूनुस यांचा बुरखा फाटला आहे आणि खरा रंग समोर आला आहे.

टॅग्स :Bangladeshबांगलादेश