बांगलादेशमध्ये गेल्या एक वर्षांपासून राजकीय अस्थिरता आणि आर्थिक संकटाची परिस्थिती कायम आहे. एकेकाळी शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आता गंभीर समस्यांना तोंड देत आहे. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी बांगलादेश सरकार आंतरराष्ट्रीय संस्थांकडून मदतीची अपेक्षा करत आहे.
बांगलादेशचे आर्थिक सल्लागार, डॉ. सलाहुद्दीन अहमद यांनी सांगितले की, बांगलादेश सध्या पाकिस्तानप्रमाणेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून कर्ज मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी आंतरराष्ट्रीय मदत संस्थांकडून अपेक्षित निधी मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
हवामान बदलामुळे ३० अब्ज डॉलर्सची गरजढाका येथील पीकेएसएफ भवनमध्ये आयोजित हवामान प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनावेळी डॉ. सलाहुद्दीन अहमद यांनी हे विधान केले. त्यांनी सांगितले की, "हवामान बदलाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी बांगलादेशला कमीत कमी ३० अब्ज डॉलर्सची गरज आहे. मात्र, याउलट, सरकारला IMF कडून फक्त १ ते १.५ अब्ज डॉलर्स मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे."
IMF कडून कर्ज मिळवण्याचे प्रयत्न सुरूच!२०२२ मध्ये बांगलादेशने IMF सोबत ४.७ अब्ज डॉलर्सच्या कर्ज करारावर स्वाक्षरी केली होती. या करारांतर्गत, बांगलादेशला फेब्रुवारी २०२३ ते जून २०२४ पर्यंत तीन हप्त्यांमध्ये २.३१ अब्ज डॉलर्स मिळाले. मात्र, काही अटींची पूर्तता न झाल्यामुळे डिसेंबरमध्ये चौथी हप्त्याची रक्कम मिळू शकली नाही. नंतर वाद मिटल्यानंतर IMF ने या वर्षी जूनमध्ये चौथी आणि पाचवी हप्त्याची रक्कम, म्हणजेच १.३३ अब्ज डॉलर्स जारी केली. याव्यतिरिक्त, बांगलादेश सरकार सामान्य लोकांच्या मदतीने देखील या संकटाचा सामना करण्यासाठी प्रयत्न करत आहे.