शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशात आणखी एका मंदिरावर हल्ला, दुर्गा पूजेसाठी बनवण्यात आलेल्या मूर्तीची विटंबना, पेट्रोलने जाळण्याचाही प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 11:10 IST

Bangladesh Hindu Crisis : बांगलादेशात मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारमध्येही सातत्याने हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. हिंदूंवर आणि हिंदूंच्या मंदिरांवर अजूनही हल्ले होत आहेत. आता दुर्गापूजेसाठी बनवण्यात आलेली मूर्ती फोडल्याची घटना समोर आली आहे.

बांगलादेशात मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारमध्येही सातत्याने हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. हिंदूंवर आणि हिंदूंच्या मंदिरांवर अजूनही हल्ले होत आहेत. आता दुर्गापूजेसाठी बनवण्यात आलेली मूर्ती फोडल्याची घटना समोर आली आहे. बांगलादेशातील शेरपूर जिल्ह्यात 31 ऑगस्टच्या रात्री ही घटना घडली.

रात्री उशिरा काही उपद्रवी लोकांनी मंदिराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि दुर्गा पूजेसाठी मातीपासून बनवण्यात आलेल्या मातेच्या मूर्तीची विटंबना केली. शेरपूर जिल्ह्यातील हा भाग मेघालय सीमेला लागून आहे. मंदिर समितीचे सरचिटणीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पेट्रोल शिंपडून मूर्ती जाळण्याचाही प्रयत्न केला, मात्र आग लागू शकली नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि लष्कराचे जवान घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान उपद्रवी हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले.

अद्याप कुणालाही अटक नाही -माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी चौकशी केली. मात्र अद्याप कुणालाही अटक झालेली नाही. तपासानंतर उपद्रवी हल्लेखोरांवर कारवाई केली जाईल, असे स्थानिक पोलिसांनी म्हटले आहे. बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतर अशा अनेक बातम्या सातत्याने समोर येत आहेत. हिंदूंच्या घरांना आणि मंदिरांना सातत्याने लक्ष्य केले जात आहे. यामुळे हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण आहे. शेख हसीना सरकार पडल्यानंतर देशात हिंसाचार माजला आहे. 52 जिल्ह्यांमध्ये हिंदूंवरील हल्ल्याच्या घटनांचा आकडा 205 वर पोहोचला आहे.

गेल्या आठवड्यात आलेल्या वृत्तांनुसार, जर भारत सरकारने व्हिसा दिला नाही, तर आम्ह सीमा ओलांडण्यासही तयार आहोत. आता आम्हाला बांगलादेशात गुदमरल्याप्रमाणे जीवन जगायचे नाही. येथे सात्याने अत्याचार वाढत आहेत. एक बांगलादेशी हिंदूने म्हटल्याप्रमाणे, कट्टरपंथी मुस्लीम लोक अजूनही जमीन, मालमत्ता, सोने, पैसे आणि मुलींची मागणी करत आहेत. येथील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. यामुळे अक्षरशः लपून राहावे लागत आहे.

टॅग्स :BangladeshबांगलादेशHinduहिंदूMuslimमुस्लीमTempleमंदिर