शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 11:20 IST

Bangladesh : बांगलादेशात केवळ इस्कॉन मंदिरावर हल्ला केला जात नाही, तर येथील इतर मंदिरांना देखिल कट्टरपंथी इस्लामिक समूहांकडून लक्ष्य केले जात आहे.

बांगलादेशात गेल्या काही महिन्यांपासून हिंदूंवर सातत्याने अत्याचार होत आहेत. इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेसचे (इस्कॉन)  प्रमुख चिन्मय कृष्ण दास यांनाही अटक करण्यात आली आहे. यानंतर याठिकाणी इस्कॉनवर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. बांगलादेशात ४ महिन्यांपूर्वी  झालेल्या सत्तापालटानंतर देशातील परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. 

शेख हसीना यांचे सरकार पडल्यावर येथील परिस्थीत अधिक बिकट बनली आणि त्या आपला देश सोडून भारतात आल्या आहेत. बांगलादेशात केवळ इस्कॉन मंदिरावर हल्ला केला जात नाही, तर येथील इतर मंदिरांना देखिल कट्टरपंथी इस्लामिक समूहांकडून लक्ष्य केले जात आहे. TOI च्या रिपोर्टनुसार, बांगलादेशमध्ये सध्या ४० हजार मंदिरे आहेत.

दरम्यान, बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेच्या काळात कट्टरपंथी इस्लामिक समूहांनी इस्कॉनला लक्ष्य केले आहे. तसेच, याविरोधात #BanISKCON आणि #ISKCONisTerrorist सारख्या ऑनलाइन मोहिमा चालवल्या जात असून देशाच्या सुरक्षिततेसाठी आणि सांप्रदायिक स्थिरतेला धोका असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी, शेख हसीना भारतात आल्यानंतर खुलना विभागातील मेहरपूर येथील इस्कॉन मंदिराची तोडफोड करून आग लावण्यात आली होती.

कट्टरपंथी इस्लामिक समूहांना खूश करण्याचा प्रयत्नबांगलादेशातील नवीन युनूस सरकारवर कट्टरपंथी इस्लामिक समूहांना खूश करण्याचा आणि इस्कॉनवर हल्ला करण्यासाठी परवानगी देण्याचा आरोप आहे. बांगलादेशातील कट्टरपंथी संघटना हिफाजत-ए-इस्लामने शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर इस्कॉनच्या विरोधात रॅली काढली, ज्यामध्ये निदर्शकांनी इस्कॉनवर बंदी घालण्याची मागणी केली. तसेच, इस्कॉनच्याविरोधात घोषणाबाजी केली. एवढेच नाही तर #BanISKCON आणि #ISKCONisTerrorist सारखे हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. याशिवाय इस्कॉनवर हिंसाचार भडकावल्याचा आणि शेख हसीना यांच्या पक्ष अवामी लीगशी संबंध असल्याचा आरोप आहे.

समुदाय तणावबांगलादेश सनातन जागरण मंच आणि इस्कॉनच्या सदस्यांनी हिंदूंवरील हल्ल्यांच्या विरोधात रॅली काढल्या आहेत. इस्कॉनवर बंदी घातल्याने हिंदू समुदायात असुरक्षितता वाढेल आणि त्यांच्या अस्मितेला धोका निर्माण होईल, असे म्हटले जात आहे. दरम्यान, बांगलादेशमध्ये इस्कॉनचे चांगले नेटवर्क आहे. बांगलादेशात ढाका, मेमनसिंह, राजशाही, रंगपूर, खुलना, बारिसाल, चटोग्राम आणि सिवहट येथे इस्कॉनची मंदिरे आहेत. येथील मंदिरावर श्रद्धा ठेवणाऱ्यांची आणि पूजा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांची संपत्तीही खूप जास्त आहे. बांगलादेशातील गरिबांना ते दररोज मदत करतात. बांगलादेशात गेल्या महिन्यात आलेल्या पुराच्यावेळीही इस्कॉन मंदिरातील लोकांनी खूप मदत केली होती.

टॅग्स :BangladeshबांगलादेशTempleमंदिरInternationalआंतरराष्ट्रीय