शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Bangladesh Fire : भयंकर! बांग्लादेशमध्ये कंटेनर डेपोला भीषण आग; 40 जणांचा होरपळून मृत्यू, 450 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2022 15:58 IST

Bangladesh Fire : बांग्लादेशातील एका खासगी कंटेनर डेपोमध्ये झालेल्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत किमान 40 लोकांचा मृत्यू झाला. या आगीत 450 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

बांग्लादेशमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. एका कंटेनर डेपोमध्ये भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आग्नेय बांग्लादेशातील एका खासगी कंटेनर डेपोमध्ये झालेल्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत 40 लोकांचा मृत्यू झाला. या आगीत 450 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री चटगावच्या सीताकुंडा उपजिल्हामधील कदमरासूल भागात आगीची भयंकर घटना घडली. येथील बीएम कंटेनर डेपोला लागलेल्या आगीत 40 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

द डेली स्टारच्या वृत्तानुसार, कंटेनर डेपोमध्ये आग लागल्यानंतर अनेक स्फोट झाले, ज्यात किमान 40 जणांना आपला जीव गमवावा लागला. तसेच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांसह शेकडो लोकांना त्याचा फटका बसला आहे. ढाका ट्रिब्यूनने रेड क्रेसेंट यूथ चटगाावचे आरोग्य आणि सेवा विभागाचे प्रमुख इस्ताकुल इस्लाम यांच्या हवाल्याने सांगितले की, या घटनेत 450 हून अधिक लोक जखमी झाले आहेत, त्यापैकी किमान 350 लोक CMCH मध्ये आहेत.

बांग्लादेश अग्निशमन सेवेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंटेनर डेपोला लागलेल्या आगीच्या घटनेत त्यांच्या तीन कर्मचाऱ्यांचाही मृत्यू झाला. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतांचा आकडा वाढू शकतो. अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने ही शक्यता वर्तवण्यात येत आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Bangladeshबांगलादेशfireआग