शहरं
Join us  
Trending Stories
1
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
2
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
3
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
4
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
5
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
6
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
7
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
8
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
9
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
10
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
11
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
12
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
13
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
14
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
15
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
16
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
17
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
18
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
19
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
20
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप

बांगलादेशानं रोहिंग्या मुस्लिमांना फोन विकण्यावर घातली बंदी, पहिल्यांदा सिम कार्डवर होती बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2017 15:54 IST

भारतानं रोहिंग्या मुस्लिमांना फटकारल्यानंतर आता बांगलादेशानंही त्यांना मोबाईल फोन विकण्यास मज्जाव केला आहे. तत्पूर्वी निर्वासित रोहिंग्या मुस्लिमांना सिम कार्ड देण्यावरही बंदी घालण्यात आली होती. सुरक्षेच्या कारणाचा हवाला देत बांगलादेशनं ही बंदी घातली असून, रोहिंग्या मुस्लिमांना आता बांगलादेशात मोबाईल फोन मिळणार नाही.

ठळक मुद्देभारतानं रोहिंग्या मुस्लिमांना फटकारल्यानंतर आता बांगलादेशानंही त्यांना मोबाईल फोन विकण्यास मज्जाव केला आहे.निर्वासित रोहिंग्या मुस्लिमांना सिम कार्ड देण्यावरही बंदी घालण्यात आली होती. सुरक्षेच्या कारणाचा हवाला देत बांगलादेशनं ही बंदी घातली असून, रोहिंग्या मुस्लिमांना आता बांगलादेशात मोबाईल फोन मिळणार नाही.

ढाका, दि. 24 - भारतानं रोहिंग्या मुस्लिमांना फटकारल्यानंतर आता बांगलादेशानंही त्यांना मोबाईल फोन विकण्यास मज्जाव केला आहे. तत्पूर्वी निर्वासित रोहिंग्या मुस्लिमांना सिम कार्ड देण्यावरही बंदी घालण्यात आली होती. सुरक्षेच्या कारणाचा हवाला देत बांगलादेशनं ही बंदी घातली असून, रोहिंग्या मुस्लिमांना आता बांगलादेशात मोबाईल फोन मिळणार नाही. बांगलादेशातील चार लोकल मोबाईल फोनच्या दुकानदारांना रोहिंग्यांना मोबाईल विकल्यामुळे शिक्षेसोबत धमकीही मिळाली होती. बांगलादेशातील टेलिकॉम मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी इनायत हुसैन यांनी रोहिंग्या मुस्लिम सिम कार्ड खरेदी करू शकत नाहीत, हे एएफपी या वृत्तसंस्थेला सांगितलं आहे.निर्वासित रोहिंग्या मुस्लिमांच्या सिम कार्ड खरेदी करण्यावर प्रतिबंध आहे. तसेच कनिष्ठ टेलिकॉम मंत्री तराना हालिम यांनी सुरक्षेच्या कारणास्तव असा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे. तसेच बांगलादेशानं स्वतःच्या देशातील नागरिकांनाही सिम कार्ड देण्याचे नियम कठोर केले आहेत. ओळखपत्राशिवाय आता तेथील नागरिकांना सिम कार्ड देण्यात येत नाही.म्यानमारमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारामुळे केवळ एका आठवड्यात सुमारे १८,००० रोहिंग्या मुस्लिमांनी बांगलादेशात पलायन केले आहे. मागील ऑक्टोबरपासून सुमारे ८७,००० रोहिंग्यांनी बांगलादेशात आश्रय घेतला आहे. स्थलांतरितांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या प्रवक्त्या संजुक्ता सहानी सांगितले की, म्यानमारचे सैनिक रोहिंग्या अतिरेक्यांच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना गावेच्या गावे जाळून भस्मसात करीत आहेत व नागरिकांवर बेछूट गोळीबार करीत आहेत. दुसरीकडे म्यानमार सरकारने हिंसाचार, अराजकासाठी रोहिंग्यांना जबाबदार धरले आहे. मागील रविवारी हिंसाचारात ठार झालेल्यांची संख्या ९६ असल्याचे सांगितले जात आहे; मात्र वास्तवातील संख्या यापेक्षा अधिक असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.म्यानमारमध्ये सुमारे १० लाख रोहिंग्या राहत असून, त्यापैकी बहुतांश संख्या राखीने प्रांतात आहे. मागील आठवड्यात रोहिंग्यांनी पोलीस चौक्यांवर हल्ले केले असून, सरकारी फौजांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. रोहिंग्यांची समस्या केवळ म्यानमार आणि बांगलादेश दरम्यानची नसून, हा आंतरराष्ट्रीय चर्चेचा विषय आहे. तसेच म्यानमारमधील रोहिंग्या मुस्लिम समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होत असून, त्यातील ४३ स्थलांतरित शरणार्थी रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील साखरी नाटे गावात आश्रयाला आले आहेत. गेल्या चार-पाच वर्षांत ते येथे दाखल झाले असून, मिळेल ते काम करून पोट भरत आहेत.सागरी मार्गाने होणाऱ्या दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेवर नाटे सागरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने परदेशी व्यक्तींची शोधमोहीम सुरू केली आहे. त्यानुसार तब्बल ४३ परदेशी व्यक्ती नाटे परिसरात राहात असल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्व व्यक्ती म्यानमारमधील असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Muslimमुस्लीम