शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

टिकटॉकवर बंदी म्हणजे चीनचे हेरगिरीचे शस्त्र हिसकाविण्यासारखे, अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 06:48 IST

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन यांनी फॉक्स न्यूज रेडिओला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, ट्रम्प प्रशासन चीनी अ‍ॅप टिक टॉक, व्हीचॅट आणि अन्य अ‍ॅपवर अतिशय गांभीर्याने विचार करत आहे.

वॉशिंग्टन : भारतासारख्या देशांनी टिक टॉकसारख्या मोबाइल अ‍ॅपवर बंदी घालणे म्हणजे चीनचे हेरगिरीचे शस्त्र हिसकावून घेण्यासारखे आहे, असे मत अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन यांनी व्यक्त केले. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन यांनी फॉक्स न्यूज रेडिओला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, ट्रम्प प्रशासन चीनी अ‍ॅप टिक टॉक, व्हीचॅट आणि अन्य अ‍ॅपवर अतिशय गांभीर्याने विचार करत आहे. टिकटॉकसारख्या अ‍ॅपवरुन निर्माण झालेल्या धोक्याबाबत ते म्हणाले की, भारताने यापूर्वीच अशा अ‍ॅपवर बंदी घातली आहे. जर अमेरिकेनेही अशा अ‍ॅपवर बंदी घातली तर अन्य काही देशही बंदी घालतील. यामुळे चाइनीज कम्युनिस्ट पार्टीचे हेरगिरीचे शस्त्र हिसकावले जाईल.

ओ ब्रायन म्हणाले की, जे मुलं टिक टॉकचा उपयोग करतात त्यांच्यासाठी ते मनोरंजन असू शकते. पण, अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मही आहेत. याचा उपयोग ते करु शकतात. ते आपला खासगी डेटा घेत आहेत. ते याची माहिती घेत आहेत की, आपले मित्र कोण आहेत? ते आपल्या सर्व संबंधांची माहिती घेत आहेत. सर्व माहिती थेट चीनच्या सुपर कॉम्युटरमध्ये जात आहे. चीन आपल्याबाबत सर्व काही जाणून घेत आहे. त्यामुळे आपण सावध राहिले पाहिजे.टिकटॉकवर बंदी लवकरच- व्हाइट हाउसने संकेत दिले आहेत की, टिक टॉकसह चीनी अ‍ॅपबाबतचा निर्णय महिन्यात नव्हे, तर काही आठवड्यात घेतला जाईल.- व्हाइट हाउसचे चीफ आॅफ स्टाफ मार्क मीडोज यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, याबाबतचा निर्णय काही आठवड्यातच होईल.- दरम्यान, २४ रिपब्लिकन संसद सदस्यांसह काँग्रेसच्या अन्य सदस्यांनी अध्यक्ष ट्रम्प यांना विनंती केली आहे की, चीनी अ‍ॅपवर बंदी आणावी.

टॅग्स :Tik Tok Appटिक-टॉकAmericaअमेरिका