शहरं
Join us  
Trending Stories
1
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
2
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
3
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
4
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
5
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
6
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
7
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
8
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
9
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
10
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
11
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
12
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
13
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
14
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
15
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
16
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
17
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
18
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
19
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
20
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 

Sri Lanka crisis: श्रीलंकेत आता साेशल मीडियावर बंदी, निदर्शने राेखण्यासाठी उचलले पाऊल, शेकडाे आंदाेलकांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 07:02 IST

Sri Lanka crisis: आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेमध्ये आणीबाणी लागू केल्यानंतर आता ३६ तासांसाठी साेशल मीडियावर बंदी घालण्यात आली आहे. सरकारच्या विराेधात जनतेला एकत्र हाेण्यापासून राेखणे, हा यामागील उद्देश असल्याची टीका श्रीलंकेतील विराेधकांनी केली आहे.

काेलंबाे : आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेमध्ये आणीबाणी लागू केल्यानंतर आता ३६ तासांसाठी साेशल मीडियावर बंदी घालण्यात आली आहे. सरकारच्या विराेधात जनतेला एकत्र हाेण्यापासून राेखणे, हा यामागील उद्देश असल्याची टीका श्रीलंकेतील विराेधकांनी केली आहे.

श्रीलंका सरकारने शनिवारी आणीबाणी घाेषित केल्यानंतर ३६ तासांसाठी संचारबंदी लागू केली हाेती. आता तेथे व्हाॅट्सॲप, ट्वीटर, फेसबुक आणि इन्स्टाग्राम यासारख्या साेशल मीडियावरही बंदी घालण्यात आली आहे. देशात वीजटंचाई, अन्नधान्य, इंधन तसेच जीवनावश्यक वस्तूंचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत जनतेला दिलासा देण्यात सरकार अपयशी ठरल्याची जाेरदार टीका हाेत आहे. सरकारविराेधात जनताही रस्त्यावर उतरू लागली आहे. त्यांना एकत्र येण्यापासून राेखण्यासाठी साेशल मीडियावर बंदी टाकण्यात आल्याची टीका हाेत आहे.

सायबर सुरक्षा आणि इंटरनेटवर लक्ष्य ठेवणारी ‘नेटब्लाॅक्स’ या संघटनेने साेशल मीडिया अनेक ॲप्सवर बंदी घालण्यात आल्याचा दुजाेरा दिला. श्रीलंकेतील प्रमुख नेटवर्क ऑपरेटर्स श्रीलंका टेलीकाॅ, माेबिटेल, हच या कंपन्या बंदीच्या कक्षेत आल्या आहेत. फेसबुक, ट्वीटर, यूट्यूब, इन्स्टाग्राम, टाॅकटाॅक, स्नॅपचॅट, व्हाॅट्सॲप, टेलिग्राम, इत्यादींवर बंदीचा परिणाम झाला आहे.

बंदीचा उपयाेग नाही- नमल राजपक्षेश्रीलंकेचे राष्ट्रपती राजपक्षे यांचा पुतण्या आणि मंत्री असलेल्या नमल राजपक्षे यांनी सरकारला साेशल मीडियावरील बंदीवरून घरचा आहेर दिला आहे. या बंदीचा काही उपयाेग नसून नागरिकांकडे व्हीपीएनसारखे इतर पर्याय उपलब्ध  असल्याचे त्यांनी सांगितले. 

६०० आंदाेलकांना केली अटकसरकारच्या विराेधात रॅली काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या ६०० हून अधिक नागरिकांना पश्चिमेकडील भागातून अटक करण्यात आली. विराेधी पक्षनेते सजित प्रेमदासा यांच्या नेतृत्वात रॅली काढण्यात आली हाेती. 

विराेधांची निदर्शनेआणीबाणी व संचारबंदीचे आदेश झुगारून श्रीलंकेतील प्रमुख विराेधी पक्ष समागी जन बलवेगयाच्या खासदारांनी काेलंबाेमध्ये जाेरदार निदर्शने केली. यावेळी राष्ट्रपती गाेटाबाया राजपक्षे यांनी घेतलेल्या निर्णयाचा विराेध करण्यात आला. श्रीलंकेत लाेकशाहीचे आम्ही रक्षण करू, असे विराेधी पक्षाचे खासदार हर्षा डिसिल्व्हा म्हणाले.

एअर इंडियाकडून उड्डाणांमध्ये कपातएअर इंडियाने श्रीलंकेमध्ये दर आठवड्यात जाणाऱ्या उड्डाणांची संख्या १६ वरून १३ पर्यंत आणली आहे. श्रीलंकेतील आर्थिक संकटामुळे मागणी कमी झाली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे एअर इंडियाने म्हटले आहे. दिल्लीहून जाणाऱ्या विमानांची संख्या कमी करण्यात येणार आहे.

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाInflationमहागाई