शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

'फितना अल हिंदुस्तान' काय आहे? पाकिस्तानला फुटला घाम; भारताविरोधात केला खोटा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 21:14 IST

भारताला पाकिस्तानची आर्थिक प्रगती सहन होत नाही. त्यामुळे भारत छुप्या युद्धाच्या माध्यमातून पाकिस्तानला नुकसान पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप बलूचिस्तानच्या मुख्यमंत्र्यांनी केला.

क्वेटा - पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांतातील मुख्यमंत्री मीर सरफराज बुगती यांनी भारतावर मोठा आरोप लावला आहे. भारताची गुप्तचर यंत्रणा RAW नं पाकिस्तानला अस्थिर करण्यासाठी 'फितना अल हिंदुस्तान' या दहशतवादी संघटनेला फंडिग करत असल्याचा पोकळ आणि खोटा दावा केला. फितना अल हिंदुस्तान ही संघटना पाकिस्तानात शांतता आणि सुरक्षेला धोका निर्माण करण्याचं काम करते. विशेषत बलूचिस्तानातील संवेदनशील भागात ही कार्यरत आहे असं सरफराज बुगतींनी म्हटलं. 

बुगती यांनी पत्रकार परिषद घेत हा दावा केला, त्यावेळी बलूचिस्तानचे मंत्री जहूर अहमद बुलेदी आणि मुख्य सचिवही हजर होते. मीर सरफराज बुगती म्हणाले की, फितना अल हिंदुस्तान एक दहशतवादी संघटन असून तिचा बलूचिस्तान अथवा बलूच समुदायाशी कुठलाही संबंध नाही. या पत्रकार परिषदेत त्यांनी काही ऑडिओही ऐकवले. ज्यात संघटनेतील २ कार्यकर्ते शानबे आणि रहमान गुल कथित रॉ अधिकाऱ्याशी बोलत असल्याचं म्हटले. खुजदारमध्ये झालेला हल्ला, जिथे लहान मुलांचा जीव गेला तो या दहशतवादी संघटनेच्या इशाऱ्यावर केला. त्या हल्ल्यात रॉ ची महत्त्वाची भूमिका होती असा दावा त्यांनी केला.

तसेच भारताला पाकिस्तानची आर्थिक प्रगती सहन होत नाही. त्यामुळे भारत छुप्या युद्धाच्या माध्यमातून पाकिस्तानला नुकसान पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे. भारत पुरस्कृत हे षडयंत्र बलूच लोकांच्या आडून पाकिस्तानचे तुकडे करू पाहते पण बलूच समाज या कारवायांचे समर्थन करत नाही असा दावाही बुगती यांनी केला. या पत्रकार परिषदेत बुगती यांनी बलूचिस्तान लिबरेशन आर्मीचाही उल्लेख केला. त्यात गायब झालेल्या यादीत अनेक स्वेच्छेने भूमिगत झाल्याचं त्यांनी म्हटलं.

दरम्यान, काही लोकांना बळजबरीने गायब करून जागतिक व्यासपीठावर पाकिस्तानला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारचे धोरण विकासावर आधारित आहे परंतु जे राज्याविरोधात शस्त्र उचलत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करू. राज्य या संघटनेच्या प्रत्येक हल्ल्याला प्रत्युत्तर देईल. पाकिस्तानच्या शांततेत, विकासाच्या मार्गावर कुठलेही षडयंत्र यशस्वी होणार नाही असंही मुख्यमंत्री बुगती यांनी सांगितले. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान