शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'ऑपरेशन हेरॉफ'ने पाकिस्तान हादरलं; ७० अतिरेकी ठार, १० जवान मृत्यूमुखी; १२ शहरांमध्ये एकाच वेळी हल्ले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 08:57 IST

बलुचिस्तानमध्ये रक्ताचा सडा पडला असून ७० अतिरेकी ठार, १० सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला आहे.

Baloch Militants Strike: पाकिस्तानचा बलुचिस्तान प्रांत शुक्रवारी रात्रीपासून भीषण हिंसाचाराने हादरला आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी या प्रतिबंधित संघटनेने पुकारलेल्या ऑपरेशन हेरॉफच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत १२ शहरांमध्ये एकाच वेळी हल्ले केले. या संघर्षात आतापर्यंत ७० अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले असून, देशाचे रक्षण करताना १० सुरक्षा रक्षक शहीद झाले आहेत.

शुक्रवारी रात्री उशिरा सुरू झालेले हे हल्ले शनिवारी सकाळपर्यंत सुरू होते. क्वेटा, ग्वादर, मकरान, हब, चमन, नसीराबाद आणि नुश्की यांसारख्या प्रमुख शहरांमधील पोलीस ठाणी, फ्रंटियर कोअरच्या चौक्या आणि सरकारी मालमत्तांना लक्ष करण्यात आले. अतिरेक्यांनी रेल्वे रुळांवर स्फोटके पेरून वाहतूक विस्कळीत करण्याचाही प्रयत्न केला, मात्र सुरक्षा दलांनी वेळीच हस्तक्षेप करत मोठा अनर्थ टाळला.

ग्वादरमध्ये अतिरेक्यांनी एकाच कुटुंबातील सदस्यांसह निरपराध नागरिकांची निर्घृण हत्या केली. बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी ७० अतिरेकी मारले गेल्याची पुष्टी केली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बीएलएने दावा केला आहे की त्यांनी नुश्की येथील दहशतवादविरोधी विभागाचे मुख्यालय आणि फ्रंटियर कोअरच्या तळाचा ताबा घेतला आहे. मात्र, पाकिस्तान सरकारने हा दावा फेटाळून लावला आहे.

दहशतवादाचा वाढता आलेख

पाकिस्तानात २०२५ या वर्षात दहशतवादी घटनांमध्ये ३४ टक्क्यांनी वाढ झाली असून एकूण ६९९ घटनांची नोंद झाली आहे. बलुचिस्तानमध्येही हिंसाचाराचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत २२ टक्क्यांनी वाढले आहे. सध्या या भागात लष्कराकडून क्लिअरन्स ऑपरेशन सुरू असून परिस्थिती तणावपूर्ण आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : 'Operation Herof' Shakes Pakistan: 70 Terrorists Killed, 10 Soldiers Dead

Web Summary : Baloch militants' 'Operation Herof' hit Pakistan hard. Attacks in 12 cities left 70 terrorists dead and 10 soldiers martyred. Security forces are conducting clearance operations after the widespread violence.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानterroristदहशतवादी