शहरं
Join us  
Trending Stories
1
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
2
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
3
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
4
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
5
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
6
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
7
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
8
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
9
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
10
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
11
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
12
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
13
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
14
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
15
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
16
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
17
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
18
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
19
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका

बगदादमध्ये दोन बॉम्बहल्ले ११९ ठार, १३० जखमी

By admin | Updated: July 4, 2016 05:55 IST

बगदाद शहरात रविवारी झालेल्या दोन बॉम्बहल्ल्यांत ८३ जण ठार, तर १७६ जण जखमी झाले.

बगदाद : बगदाद शहरात रविवारी झालेल्या दोन बॉम्बहल्ल्यांत ८३ जण ठार, तर १७६ जण जखमी झाले. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अत्यंत वर्दळीच्या येथील कराडा नावाच्या व्यापारी पेठेत कारबॉम्बने हल्ला करण्यात आला. त्यात ११९ ठार, तर १३० जण जखमी झाले. रमजान महिन्याचा उपवास सोडून अनेक कुटुंबे आणि तरुण मुले रस्त्यावर आली होती. तेव्हा हा हल्ला झाला. मृतांमध्ये बहुतांश तरुणांचा समावेश आहे. इस्लामिक स्टेटने या हल्ल्याची जबाबदारी आॅनलाइन पोस्ट केलेल्या निवेदनाद्वारे घेतली. आम्ही शिया मुस्लिमांना मुद्दाम लक्ष्य केल्याचे या निवेदनात म्हटले आहे. मात्र, या निवेदनाची स्वतंत्ररीत्या खातरजमा करता आलेली नाही. दुसरा हल्ला पूर्व बगदादमध्ये घडविण्यात आला. त्यात पाच जण ठार व १६ जण जखमी झाले. या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही गटाने घेतलेली नाही. >कारबॉम्बचा हल्ला प्रत्यक्ष बघणाऱ्याने सांगितले की स्फोटामुळे जवळपासच्या कपड्यांच्या व मोबाईल फोन दुकानांना आग लागली. बॉम्बहल्ले झाल्यानंतर कित्येक तासांनी इराकचे पंतप्रधान हैदर अल अबादी यांनी घटनास्थळाला भेट दिली.सोशल मीडियावर अपलोड करण्यात आलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये संतप्त लोक अबादी यांना ‘चोर’ म्हणताना दिसत होते. इस्लामिक स्टेटच्या तावडीतून फलुजा शहर मुक्त करण्यात आल्याची घोषणा इराकच्या सैन्याने केल्यानंतर अवघ्या आठवड्यात हा हल्ला झाला. गेल्या वर्षभरात इराकच्या सैन्याने आयएसच्या ताब्यातून बऱ्यापैकी भूभाग पुन्हा मिळवला आहे. त्यात बगदादच्या पश्चिमकडील विस्तीर्ण प्रांत अनबरमधील रामादी, हित आणि रुतबा ही शहरे पुन्हा ताब्यात घेतली आहेत.सरकारने भूभाग, काही शहरे आयएसकडून पुन्हा मिळविली असली तरी आयएसने आपण जोरदार हल्ले करण्याची कुवत राखून असल्याचेच सिद्ध केले आहे.>अनेक इमारती आगीत खाकस्फोटानंतर जवळपासच्या अनेक दुकानांना एकाचवेळी आग लागली. त्यामुळे संपूर्ण परिसरात हाहाकार माजला होता.इमारतींना लागलेली आग विवझवण्यात आल्यानंतर जळून पडलेल्या मृतदेहांचा खच दिसत होता. ऐन सायंकाळी गर्दीच्या वेळी स्फोट झाल्याने मृतांची संख्या वाढली असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.