शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Baba Vanga Predictions 2022: बाबा वेंगांच्या २०२२ साठीच्या दोन भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या; आणखी चार प्रतिक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 17:29 IST

बाबा वेंगा ही एक फकीर होती. तिचा १९११ मध्ये बल्गेरियात जन्म झाला होता. वयाच्या १२ व्या वर्षीच तिची दृष्टी गेली होती. तिने वर्तविलेले ८५ टक्के अंदाज खरे ठरले आहेत.

जगभरात ज्यांच्या भविष्यवाणींची चर्चा असते असे दोन प्रसिद्ध भविष्यवेत्ते नास्त्रादमस आणि बाबा वेंगा यांनी २०२२ बाबतही खूप काही सांगून ठेवले आहे. यापैकी बाबा वेंगा यांच्या दोन भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. वेंगा यांनी यापूर्वीही अनेक भविष्ये सांगितली होती, त्यापैकी अनेक खरी ठरली तर अनेक गोष्टी खोट्या ठरल्या आहेत. 

बाबा वेंगा यांनी आपल्या अनुयायांकडे जवळपास 5079 पर्यंतच्या भविष्यवाण्या केलेल्या आहेत. द मिररनुसार बाबा वेंगा यांनी २०२२ मध्ये काही देशांत पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होईल असे म्हटले होते. पोर्तुगाल आणि इटलीसारख्या देशांमध्ये १९५० पासूनचा सर्वात मोठा दुष्काळ पडला आहे. 

याचबरोबर एकीकडे दुष्काळ असताना आशियाई देश आणि ऑस्ट्रेलियाच्या काही भागात पूरपरिस्थिती निर्माण होणार असल्याचे बाबा वेंगा हिने म्हटले होते. तसेच भूकंप, त्सुनामी येईल असे म्हटले होते. अतिवृष्टीमुळे ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेकडील किनारपट्टीवर विध्वंस झाला होता. तसेच भारत, थायलंडसह काही देशांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. 

बाबा वेंगा ही एक फकीर होती. तिचा १९११ मध्ये बल्गेरियात जन्म झाला होता. वयाच्या १२ व्या वर्षीच तिची दृष्टी गेली होती. तिने वर्तविलेले ८५ टक्के अंदाज खरे ठरले आहेत. 2022 बाबत बाबा वेंगा यांनी आणखी चार भविष्यवाणी केल्या आहेत. यामध्ये सायबेरियामध्ये आणखी एक जिवघेणा व्हायरस जन्माला येणार असल्याचे म्हटले आहे. याचबरोबर २०२२ मध्ये पृथ्वीवर एलिअन्स हल्ला करतील, असेही म्हटले आहे. लोकस्ट नावाचा कीडा देखील अनेक देशांत हल्ले करेल, असेही तिने म्हटले आहे. याचबरोबर व्हर्चुअल रिअॅलिटीचा वापर वाढणार असल्याचे तीने म्हटले होते. बाबा वेंगा हिचा कर्करोगामुळे १९९६मध्ये मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी 5079 वर्षापर्यंतचे भाकीत केले आहेत. बाबा वेंगाच्या मते, जगाचा अंत ५०७९ मध्ये होईल. या भविष्यवाण्या कुठेही तिने लिहिलेल्या नव्हत्या, तर त्या तिच्या अनुयायांना सांगितलेल्या होत्या.