शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
3
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
4
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
5
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
6
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
7
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
8
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
9
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
10
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
11
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
12
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
13
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
14
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
15
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
16
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
17
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
18
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
19
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
20
५० रुपये प्रति तास या हिशोबाने भाड्याने मिळतायेत 'Friend'; केरळमधील अजब ट्रेंडनं वाढवलं टेन्शन

Moon Soil Plant: अफलातून प्रयोग! चंद्रावरून आणलेल्या मातीत उगवले रोपटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 06:45 IST

अमेरिकी शास्त्रज्ञांची ऐतिहासिक कामगिरी

वॉशिंग्टन : माणसासह प्राणिमात्रांना भूतलावर जगण्यासाठी पाणी आणि प्राणवायू यांची गरज असते. पृथ्वीप्रमाणेच ब्रह्मांडातही असे वातावरण असेल किंवा कसे, याचा शोध घेण्याचा मानवाचा प्रयत्न अव्याहत सुरू आहे. पृथ्वीचा उपग्रह असलेल्या चंद्रावर त्यासाठी अनेक मोहिमाही राबविण्यात आल्या. यातील एका मोहिमेत चंद्रावरून माती आणण्यात आली. या मातीत आता रोपटे उगविण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी ही ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे.

काही वर्षांपूर्वी 'नासा'च्या अपोलो मोहिमेतील अंतराळवीरांनी चंद्रावरुन ही माती आणली होती. चंद्रावरुन आणलेल्या मातीत पहिल्यांदाच रोपटं उगवण्यात त्यांना यश आले आहे. नासाच्या अपोलो मोहिमेतील सहा अंतराळवीर चंद्रावरून ३८२ किलो वजनाचे दगड घेऊन आले होते. हे दगड शास्त्रज्ञांना वाटण्यात आले. फ्लोरिडा विद्यापीठाचे प्रोफेसर रॉबर्ट फेरी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना नासाकडून १२ ग्रॅम माती मिळाली. इतक्या कमी मातीत काम करणे खूप अवघड होते, पण अखेरीस यश मिळाले.  (वृत्तसंस्था)

असा केला प्रयोग...n चंद्रावरच्या मातीला रेगोलिथ असे म्हटले जाते. मातीचे चार वेगवेगळ्या भागात विभाजन करून त्यात पाणी आणि पोषक घटक असलेले द्रव्य शास्त्रज्ञांनी मिसळले.n यानंतर त्यात अर्बिडोप्सिसच्या बिया टाकल्यानंतर काही दिवसांतच कुंडीत लहान रोपटे उगवले. n रोपाविषयीची सविस्तर माहिती ‘जर्नल ऑफ कम्युनिकेशन्स बायोलॉजी’मध्ये प्रकाशित करण्यात आली आहे.  

टॅग्स :Plantsइनडोअर प्लाण्ट्स