शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी भारताशी पंगा अन् आता पाकिस्तानचा उल्लेख करत 'या' देशानं केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक
2
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
3
रशियासाठी लढत होता २२ वर्षांचा भारतीय तरुण; युक्रेनच्या सैन्यानं पकडलं! व्हिडीओतून समोर आलं धक्कादायक सत्य
4
पुणे हादरलं! 'माझ्या आईला का मारलं?', घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला
5
आरबीआयनं महाराष्ट्रातील या सहकारी बँकेचा परवाना केला रद्द, ग्राहकांना आपल्याच खात्यातून पैसे काढता येणार नाही
6
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
7
Video: १२० ग्रॅम सोने, १८ लाख देऊन युवकानं केलं घटस्फोटाचं सेलिब्रेशन; दुधानं केली आंघोळ, मग...
8
थरार! जयपूर-अजमेर हायवेवर गॅस टँकरचा स्फोट; परिसरात हाहाकार, २० गाड्या आगीत भस्म
9
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
10
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
11
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
12
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
13
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
14
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
15
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
16
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
17
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
18
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
19
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती

"अदानींचा खूप आदर करतो", ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान असं काय म्हणाले? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 19:08 IST

उद्योगपती गौतम अदानी आणि अदानी समूह सध्या वाईट काळाचा सामना करत आहे. अब्जावधींचं नुकसान सहन करावं लागलं आहे.

उद्योगपती गौतम अदानी आणि अदानी समूह सध्या वाईट काळाचा सामना करत आहे. अब्जावधींचं नुकसान सहन करावं लागलं आहे. यातच ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अ‍ॅबॉट यांनी मात्र अदानींना आधार दिला आहे. गौतम अदानी यांच्याबाबत आपल्याला खूप आदर वाटतो, असं विधान टोनी अ‍ॅबॉट यांनी केलं आहे.

हिंडनबर्ग रिसर्चच्या रिपोर्टनुसार अदानी ग्रूपची पडझड सुरू झाली. कंपनीचे शेअर ऐतिहासिक पातळीवर घसरले. तर गौतम अदानींच्या संपत्तीतही प्रचंड घट झाली. अदानी समूहावरील आरोपांना प्रत्युत्तर देताना माजी पंतप्रधान टोनी अ‍ॅबॉट यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, अदानी आणि त्यांच्या समूहाबद्दल मला खूप आदर आहे. संबंधित नियामक संस्था अदानींवरील आरोपांची चौकशी करून त्यांचं काम करतील.

कारमाइकल कोळसा खाण प्रकल्पात अदानी समूहाच्या गुंतवणुकीबाबतही त्यांनी महत्वाचं विधान केलं. या खाणींमधून निर्माण होणाऱ्या कोळशामुळे भारतातील विद्युतीकरणाला नक्कीच चालना मिळेल, असं ते म्हणाले. 'मी अदानी खाणीच्या बाजूने आहे. मी अदानी आणि त्यांच्या टीमचे आभार मानतो की त्यांनी भारतीयांना वीज, रोजगार आणि ऑस्ट्रेलियाला समृद्धी देण्यासाठी खूप काही केलं आहे', असंही ते पुढे म्हणाले. 

कोर्टाच्या निर्णयाचा केला निषेधमाजी पंतप्रधान टोनी अ‍ॅबॉट हे ऑस्ट्रेलियातील अदानी समूहाचे समर्थक मानले जातात. ऑस्ट्रेलियातील कारमाइकल कोळसा खाणींसाठीही त्यांनी अदानी समूहाला पाठिंबा दिला. २०१५ मध्ये, ऑस्ट्रेलियन न्यायालयाने अदानीच्या कोळसा खाण प्रकल्पाविरुद्ध निर्णय दिला तेव्हा त्यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान म्हणून या निर्णयाचा निषेध केला.

टोनी अ‍ॅबॉट म्हणाले, 'माझ्या मते अदानी ही ऑस्ट्रेलियाच्या भल्याचा विचार करणारी व्यक्ती आहे. एक प्रचंड व्यावसायिक साम्राज्य उभारण्यात त्यांनी खूप मेहनत केली आहे आणि याही पुढील काळात त्यांच्या यशाबद्दल मला खात्री आहे'

अदानींना २०१९ मध्ये मिळालेलं कंत्राट२०१५ मध्ये, स्थानिक न्यायालयाने कारमाइकल कोळसा खाण प्रकल्पासाठी अदानीची पर्यावरणीय मंजुरी नाकारली. यानंतर, टोनी अ‍ॅबॉट यांनी सार्वजनिकरित्या याचे वर्णन 'व्यापक जगाला धक्का' असं केलं होतं. नंतर २०१९ मध्ये, अदानी समूहाला कारमाइकल कोळसा खाण प्रकल्पासाठी अंतिम परवानगी मिळाली होती.

अदानी समूह ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड येथे विकसित करत असलेली कोळसा खाण जगातील सर्वात मोठ्या कोळसा खाणींपैकी एक आहे. या खाणीतून मिळणारा कोळसा भारतातील वीज प्रकल्पांना नियमितपणे पुरवला जातो.

टॅग्स :Gautam Adaniगौतम अदानी