शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प यांना मारण्याचा प्रयत्न! व्हाईट हाऊसमध्ये पोहोचण्यापूर्वीच पकडलं विषाचं पाकीट

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: September 20, 2020 12:49 IST

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पाकीट ‘रिसिन’ नावाच्या विषाने भरलेले होते. रिसिनच्या संपर्कात याणाऱ्याचा 36 ते 72 तासांत मृत होऊ शकतो. रिसिनसाठी अद्याप कुठल्याही प्रकारचे अँटीडोट उपलब्ध नाही.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पाकीट ‘रिसिन’ नावाच्या विषाने भरलेले होते. रिसिनच्या संपर्कात याणाऱ्याचा 36 ते 72 तासांत मृत होऊ शकतो. रिसिनसाठी अद्याप कुठल्याही प्रकारचे अँटीडोट उपलब्ध नाही.

वॉशिंग्टन - अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे वारे वाहत असतानाच, एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने आलेले विषाने भरलेले एक पाकीट व्हाईट हाऊसमध्ये पोहोचण्यापूर्वीच जप्त केले आहे. यामुळे अध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वीच ट्रम्प यांच्या हत्येचे षडयंत्र रचले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.  

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पाकीट ‘रिसिन’ नावाच्या विषाने भरलेले होते. हे पाकीट व्हाईट हाऊसमध्ये येणाऱ्या सर्व पत्राची आणि पार्सल्सची तपासणी करताना पकडण्यात आले. संबंधित अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटिवर सांगितले, की हे पाकिट अथवा पत्र कुणी आणि कुठून पाठवले यासंदर्भात एफबीआय तपास करत आहे. 

व्हाईट हाऊससाठी आलेले कुठले पत्र अथवा पार्सल राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी तपासले जाते. हे पार्सल कॅनडा येथून आल्याचा संशय आहे.

रिसिनच्या संपर्कात येणाऱ्याचा 36 ते 72 तासांत होऊ शकतो मृत -अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रारंभिक तपासात पाकिटात रिसिन नावाचे विष असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे विष प्रामुख्याने एरण्डीच्या बियांत आढळते. महत्वाचे म्हणजे रिसिनसाठी अद्याप कुठल्याही प्रकारचे अँटीडोट उपलब्ध नाही. एखाद्या व्यक्तीच्या शरिरात हे विष गेले, तर देण्यात आलेल्या विषाच्या प्रमाणानुसार, त्या व्यक्तीचा 36 ते 72 तासांत मृत्यू होतो. अमेरिकन सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार, हे विष अनेक वेळा दहशतवादी हल्ल्यांतही वापरण्यात आले आहे. याचा वापर पावडर, गोळी अथवा ‌‌अॅसिडच्या स्वरुपातही केला जातो. 

महत्त्वाच्या बातम्या -

केंद्र सरकारच्या 3 योजना, केवळ 400 रुपयांत सुरक्षित होईल भविष्य

भारत-चीन वादात रशियाची एन्ट्री, मोठा आहे पुतीन यांचा आशिया खंडातला प्लॅन 

धक्कादायक खुलासा : भारतात तब्बल 62 टक्के महिला अ‍ॅप्सच्या माध्यमाने करतात 'सेक्सटिंग'

"झोपेत घोरत असाल तर सावधान! कोरोनामुळे मृत्यूचा तिप्पट धोका"

मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी

 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाUSअमेरिकाPresidentराष्ट्राध्यक्ष