जर्मनीतील मॅग्डेबर्ग येथील ख्रिसमस मार्केटमध्ये एक कार गर्दीत घुसली, या घटनेत दोन जण ठार झाले. मृतांमध्ये एका लहान मुलाचाही समावेश असून ६० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी कार चालवणाऱ्या ५० वर्षीय सौदी अरेबियाच्या डॉक्टरला अटक केली आहे. दरम्यान, सौदी अरेबियाने या अपघाताचा निषेध केला आहे.
"पॉर्नपासून मुक्ती हवी असेल, तर..."; व्लादिमीर पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं
याआधी या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती, मात्र अधिकाऱ्यांनी आत्तापर्यंत फक्त दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. सॅक्सोनी-अनहॉल्ट राज्याचे प्रमुख रेनर हॅसलहॉफ यांनी या घटनेबद्दल सांगितले की, वैद्यकीय व्यावसायिक असलेला हा माणूस दोन दशकांपासून कायमस्वरूपी रहिवासी म्हणून जर्मनीमध्ये राहत होता. हा एकमेव गुन्हेगार आहे.
या वाहनात स्फोटके असावीत, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता, मात्र तपासात स्फोटके सापडली नाहीत. या भीषण घटनेच्या वेळी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत बाजारपेठ गाठून परिस्थिती नियंत्रणात आणून त्या व्यक्तीला अटक केली. स्थानिक प्रशासनाने सांगितले की, पोलिसांनी संशयित हल्लेखोराला अटक केली आहे. तो व्यवसायाने डॉक्टर असून तो सौदी अरेबियाचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. गाडीत तो एकटाच होता.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेली माहिती अशी, कार थेट टाउन हॉलच्या दिशेने असलेल्या मार्केटमधील गर्दीच्या दिशेने गेली. जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांनी या घटनेवर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, "मॅगडेबर्गहून येणाऱ्या बातम्यांवरून काहीतरी भयंकर घडल्याचे सूचित होते.
जर्मनीच्या मॅग्डेबर्ग शहरातील बाजारपेठेत घडलेल्या या घटनेचा सौदीच्या परराष्ट्र मंत्रालयाने निषेध केला आहे. या घटनेच्या व्हिडीओमध्ये प्रचंड गर् दिसत आहे, या गर्दीत कार अचानक गेल्याचे दिसत आहे. सौदीच्या मंत्रालयाने सांगितले की, सौदी अरेबियाने जर्मन लोक आणि पीडितांच्या कुटुंबियांशी एकता व्यक्त केली.