शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

'नरेंद्र मोदींच्या पक्षाकडून भारतीय मुस्लिमांवर अत्याचार', बिलावल भुट्टोने पुन्हा गरळ ओकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 07:54 IST

यापूर्वी बिलावल भुट्टोने पीएम नरेंद्र मोदींना 'गुजरातचा कसाई' म्हटले होते.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल झरदारी भुट्टो यांनी पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकली आहे. नरेंद्र मोदी यांच्या पक्षाकडून भारतातील मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याचा आरोप बिलावल यांनी एका मुलाखतीदरम्यान केला. भारत सरकार गुजरातमधील मुस्लिमांवर खूप अत्याचार करत आहे, असेही ते म्हणाले. वॉशिंग्टन डीसीमध्ये ब्लूमबर्ग टेलिव्हिजनला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

विशेष म्हणजे, भुट्टो यांनी यापूर्वीही नरेंद्र मोदींवर वैयक्तिक हल्ले केले होते. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी फटकारल्यामुळे संतप्त झालेल्या पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी मोदींवर अपमानास्पद टीका करत, त्यांना 'गुजरातचा कसाई' असे संबोधले होते. ओसामा बिन लादेनचा मृत्यू झाला, पण 'गुजरातचा कसाई' अजूनही जिवंत आहे आणि तो भारताचा पंतप्रधान आहे, असे वादग्रस्त वक्तव्य भुट्टोंनी केले होते.

भारताचे भुट्टोला प्रत्युत्तर बिलावलने पंतप्रधान मोदींवर केलेल्या अशोभनीय वक्तव्यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र प्रतिक्रिया दिली होती. एक निवेदन जारी करताना भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने बिलावलचे वक्तव्य असभ्य असल्याचे म्हटले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देताना सांगितले की, यावरून पाकिस्तान भारताविरुद्ध विष ओकण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकतो हे दिसून येते, असे ते म्हणाले.

तसेच, पाकिस्तानला 1971 ची आठवण करून देताना भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते की बिलावल झरदारी भुट्टो बहुधा 1971 विसरले आहेत. तेव्हा पाकिस्तान सरकारने बंगाली आणि हिंदूंची हत्या केली होती. पाकिस्तानला दहशतवाद्यांचे आश्रयस्थान असल्याचे सांगून परराष्ट्र मंत्रालयाने असेही म्हटले की, पाकिस्तान हा एकमेव देश आहे, जो दहशतवादी ओसामा बिन लादेनला शहीद दाखवतो. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तान