शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

भारतीय शास्त्रज्ञाचा खगोलीय सिद्धांत ७० वर्षांनी झाला सिद्ध, निरीक्षणाने पुष्टी; ‘रेग्युलस’ ता-याच्या ध्रुवीय प्रकाशाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 04:31 IST

प्रचंड वेगाने स्वत:भोवती परिभ्रमण करणा-या ता-यातून ध्रुवीय प्रकाश (पोलर लाइट) उत्सर्जित होतो, हा ‘नोबेल’ पुरस्कार विजेते भारतीय खगोल वैज्ञानिक सुब्रह्मण्यन चंद्रशेखर यांनी सुमारे ७० वर्षांपूर्वी मांडलेला सिद्धांत आॅस्ट्रेलियातील वैज्ञानिकांनी आता प्रयोगांती प्रत्यक्ष सिद्ध केला आहे.

मेलबर्न : प्रचंड वेगाने स्वत:भोवती परिभ्रमण करणा-या ता-यातून ध्रुवीय प्रकाश (पोलर लाइट) उत्सर्जित होतो, हा ‘नोबेल’ पुरस्कार विजेते भारतीय खगोल वैज्ञानिक सुब्रह्मण्यन चंद्रशेखर यांनी सुमारे ७० वर्षांपूर्वी मांडलेला सिद्धांत आॅस्ट्रेलियातील वैज्ञानिकांनी आता प्रयोगांती प्रत्यक्ष सिद्ध केला आहे.आॅस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स विद्यापीठ व लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजातील संशोधकांनी रात्रीच्या आकाशात अत्यंत प्रखरतेने दिसणाºया ‘रेग्युलस’ या अत्यंत दूरवरच्या ताºयाचे अतिसंवेदनशील साधनांच्या साह्याने निरीक्षण करून, त्या ताºयातून खरोखरच ध्रुवीय प्रकाश उत्सर्जित होत असल्याची नोंद केली. न्यू साउथ वेल्स विद्यापीठाचे डॉ. डॅनियल कॉटन यांच्या नेतृत्वाखालील वैज्ञानिकांच्या चमूने केलेल्या या निरीक्षणावर आधारित प्रबंध, ‘नेचर अ‍ॅस्ट्रॉनॉमी’ या वैज्ञानिक नियतकालिकाच्या ताज्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.‘सिंह’ नक्षत्रपुंजात असलेला ‘रेग्युलस’ हा तारा पृथ्वीपासून ७९ प्रकाशवर्षे दूर आहे. गेल्या महिन्यात दक्षिण अमेरिका खंडात खग्रास सूर्यग्रहणाने भर दुपारी मिट्ट काळोख झाला, तेव्हा सूर्यापासून दोन अंशावर ‘रेग्युलस’ ताºयाचा सर्वात प्रकाशमान ठिपका अभ्यासकांनी पाहिला होता.डॉ. चंद्रशेखर यांनी ‘ध्रुवीय प्रकाशा’चा गणितीय सिद्धांत सन १९४६ मध्ये मांडल्यापासून, ब्रह्मांडातील अशा प्रकाशाचे निरीक्षण करण्यासाठी ‘स्टेलर पोलरीमीटर’ या वर्गातील उपकरणे आणि साधने विकसित करण्यास सुरुवात झाली होती. डॉ. कॉटन यांच्या वैज्ञानिक तुकडीने ‘हायप्रीसिजन पोलरीमेट्रिक इन्स्ट्रुमेंट’ या आजवरच्या सर्वाधिक प्रगत उपकरणाने हे निरीक्षण केले.लोह आणि निकेल यासारखी सर्वात जास्त घनतेची मूलद्रव्ये ज्यांच्यापासून दोन तारामंडळांमधल्या पोकळीत विखुरली जातात, अशा आकाशगंगेतील सर्वादिक उष्ण व आकाराने मोठ्या ताºयांचा उत्पत्तीपट उलगडण्यासही या निरीक्षणातून मिळालेली माहिती मोलाची ठरेल, असेही डॉ. कॉटन म्हणाले. (वृत्तसंस्था)>एका सेकंदात३२0 किमी वेगडॉ. कॉटन यांनी लिहिले की, ९६.५ अंशाने आसावर झुकलेला ‘रेग्युलस’ एवढ्या प्रचंड वेगाने स्वत:भोवती फिरताना आम्हाला दिसला की, कलंडून स्थानभ्रष्ट होईल की काय, असे आम्हाला क्षणभर वाटले. त्याच्या परिभ्रमणचा वेग सेकंदाला ३२० किमी एवढा आम्ही मोजला. म्हणजे सिडनी ते कॅनबेरा हे अंतर एक सेकंदाहून कमी वेळात पार करण्यासारखे आहे.