शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

११ देशांकडून ‘ॲस्ट्राझेनेका’च्या काेराेना लसीचा वापर स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 06:03 IST

लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या झाल्याने चाैघांचा मृत्यू; ‘डब्ल्यू  एचओ’कडून तपास सुरू

‘डब्ल्यू एचओ’कडून तपास

जागतिक आराेग्य संघटनेची (डब्ल्यू  एचओ) लस सल्लागार समिती या प्रकरणाचा अभ्यास करीत आहे. आतापर्यंत लस आणि रक्ताच्या गुठळ्या निर्माण हाेण्यामध्ये थेट संबंध उघड झालेला नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. विविध कंपन्यांच्या लसींचे एकूण २६.८ काेटी डाेस आतापर्यंत देण्यात आले असून लसींच्या दुष्परिणामांमुळे काेणाचाही मृत्यू झाल्याचे उघड झालेले नाही, असे संघटनेने म्हटले आहे.

लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा ‘ॲस्ट्राझेनेका’ने केला असून, मानवी चाचण्यांदरम्यान सखाेल अभ्यास करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनी ऑस्ट्रियन अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून तपासासाठी पूर्ण सहकार्य करेल, असे कंपनीने म्हटले आहे. 

25 टक्के कपात ‘ॲस्ट्राझेनेका’ने युराेपमध्ये हाेणाऱ्या लसपुरवठ्यात केली आहे. कंपनी युराेपियन देशांना एकूण ४ काेटी डाेस पुरविणार हाेती. मात्र, 3 कोटी डाेस पाठविणार आहे. इटलीतून ऑस्ट्रेलियाला पाठविण्यात येणारा साठा युराेपियन कमिशनने राेखल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. 

काेपेनहेगन : लस घेतल्यानंतर रक्ताच्या गाठी निर्माण झाल्यानंतर युराेपमध्ये ४ जणांचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर युराेपमधील १० देशांसह एकूण ११ देशांनी  ब्रिटनमधील  ‘ॲस्ट्राझेनेका’ कंपनीच्या लसीचा वापर तात्पुरता थांबविला आहे. डेन्मार्कपाठाेपाठ राेमानिया, नाॅर्वे आणि आईसलँड या देशांनी लसीचा वापर थांबविला आहे, तर इटलीने लसीच्या एका बॅचचा वापर स्थगित केला आहे.

‘ॲस्ट्राझेनेका’ आणि ऑक्सफाेर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लसीचा आपत्कालीन वापर युरोपातील अनेक देश करत आहेत. मात्र, लस घेतल्यानंतर काहीजणांमध्ये रक्ताच्या गुठळ्या निर्माण झाल्याचा प्रकार लक्षात आला आहे. गुठळ्या निर्माण झाल्याने इटलीमध्ये दाेघांचा मृत्यू झाला, तर नुकताच डेन्मार्कमध्येही एकाचा मृत्यू झाला हाेता. 

ऑस्ट्रियामध्ये काही दिवसांपूर्वी एका नर्सचा मृत्यू झाला हाेता. याची दखल घेत ऑस्ट्रियाने तत्काळ लसीच्या एका बॅचचा वापर थांबविला हाेता. त्यानंतर इस्टाेनिया, लॅटीव्हिया, लिथुएनिया, नाॅर्वे, आईसलँड आणि लक्सेमबर्ग या देशांनी ‘ॲस्ट्राझेनेका’च्या लसीचा वापर थांबविला हाेता. थायलंडमध्ये लसीकरण माेहीम सुरू हाेणार हाेती. मात्र, सावधगिरीचा उपाय म्हणून या लसीचा वापर थांबविण्यात आला आहे.

रक्ताच्या गाठी निर्माण हाेण्याचा लसीशी संबंध असल्याचे ठाेस पुरावे नाहीत. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून तात्पुरता वापर थांबविल्याचे डेन्मार्कच्या आराेग्य विभागाचे संचालक साेरेन ब्राेस्टाॅर्म यांनी सांगितले. दाेन आठवड्यांनंतर याबाबत आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. भारतात ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’तर्फे या लसीचे उत्पादन करण्यात येते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस