शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
5
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
6
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
7
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
8
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
9
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
10
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
11
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
12
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
13
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
14
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
15
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
16
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
17
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
18
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
19
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
20
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत

पनामा पेपर्सचा घोटाळा उघड करणा-या महिला पत्रकाराची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 20:29 IST

पनामा पेपर्सचा घोटाळा उघड करणा-या महिला पत्रकाराची हत्या करण्यात आली. पत्रकार डॅफनी कॅरुआना गलिजिया यांच्या कारमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यात आला असून, त्यात त्यांचा मृत्यू झालाय.

वलेत्ता - पनामा पेपर्सचा घोटाळा उघड करणा-या महिला पत्रकाराची हत्या करण्यात आली. पत्रकार डॅफनी कॅरुआना गलिजिया यांच्या कारमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यात आला असून, त्यात त्यांचा मृत्यू झालाय. दक्षिण युरोपातील माल्टा देशात स्थायिक झालेल्या डॅफनी आपल्या घरातून उत्तर माल्टाच्या दिशेनं कारमधून जात होत्या. त्यावेळी अचानक त्यांच्या कारमध्ये बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटात त्यांचा जागीच मृत्यू झाला. धडाडीच्या पत्रकार डॅफनी यांच्या मृत्यूनंतर माल्टातील तीन हजार नागरिक रस्त्यावर उतरले असून, हल्ल्याच्या निषेधार्थ त्यांनी कँडल मार्चसुद्धा काढलाय. माल्टाचे पंतप्रधान जोसेफ मस्कट यांनी डॅफनी यांच्या हल्ल्याचा निषेध नोंदवलाय. पत्रकारांची हत्या करणं म्हणजे एक प्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच आघात आहे. पत्रकार म्हणून त्या माझ्या विरोधक होत्या. परंतु त्यांच्या हत्येचा निषेधच करत असल्याचं ते म्हणाले आहेत.डॅफनी या स्वतंत्र ब्लॉग लिहित होत्या. ब्लॉगमधून त्यांनी भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं उघडकीस आणली. त्यामुळे त्यांची लेडी विकिलिक्स नावानं देखील ओळख आहे. मृत्यूपूर्वी त्यांनी एक ब्लॉग प्रसिद्ध केला होता. त्या ब्लॉगमध्येसुद्धा त्यांनी आजूबाजूच्या परिस्थितीवर भाष्य केलं होतं. ब्लॉगमध्ये त्यांनी ‘इथे लबाड लोक राहत असून, परिस्थिती भयंकर आहे,’ असंही म्हटलंय.डॅफनी यांनी 2016मध्ये पनामा पेपर्समध्ये माल्टासंदर्भात अनेक खळबळजनक गौप्यस्फोट केले होते. या गौप्यस्फोटांमध्ये आइसलँड, युक्रेनचे राष्ट्रपती, साऊदी अरेबियाचे शाह आणि इंग्लंडचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमरुन यांच्या वडिलांच्या नावाचा समावेश होता. तसेच रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतिन, अभिनेता जॅकी चेन आणि फुटबॉलपटू लायनल मेसी यांच्याही नावाबाबत अनेक खुलासे केले होते.