शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

इराणी अणुबॉम्बच्या जन्मदात्याची दिवसाढवळ्या हत्या; इस्त्रायलला बदल्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2020 08:55 IST

Mohsen Fakhrizadeh Murder: इराणचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद जवाद जरीफ यांनी सांगितले की, इस्त्रायलने यावर टिप्पणी करण्यास नकार दिला आहे. दहशतवाद्यांनी एका ज्येष्ठ इराणी वैज्ञानिकाची हत्या केली.

इराणचे अणुबॉम्बचे जनक वैज्ञानिक मोहसिन फखरीजादेह यांची तेहरानमध्ये हत्या करण्यात आली. यामुळे इस्त्रायलसोबतचा तणाव आणखी वाढला असून युद्धाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. इराणने या हल्ल्यामागे इस्त्रायलचा हात असल्याचे पुरावे सापडले असल्याचा आरोप केला आहे. 

इराणचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद जवाद जरीफ यांनी सांगितले की, इस्त्रायलने यावर टिप्पणी करण्यास नकार दिला आहे. दहशतवाद्यांनी एका ज्येष्ठ इराणी वैज्ञानिकाची हत्या केली. या हत्येवरून असे दिसून येते की इस्त्रायल युद्धासाठी उतावीळ आहे. फखरीजादेह यांचे नाव इस्त्रायलच्या बेजामिन नेतन्याहू यांनी एका कार्यक्रमात घेतले होते. 

फखरीजादेह हे प्रवासात असताना तेहरान जवळ हल्लेखोरांनी त्यांच्या कारवर गोळीबार केला. अज्ञात हल्लेखोरांच्या गोळीबारात ते जखमी झाले. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. 

फखरीजादेह हे 2003 पासून इराणच्या गुप्त अणुबॉम्ब निर्मिती मोहिमेचे नेतृत्व करत होते. मात्र, इराण आण्विर हत्यारे बनविण्याच्या आरोपांचे नेहमी खंडण करत आला आहे. इराणचे मिलिट्री कमांडर हिसैन देहघन यांनी ट्विट करत या हत्येचा मोठा बदला घेतला जाईल. या हल्ल्यात ज्यांचा हात आहे ते लोक पस्तावणार आहेत, अशी धमकी दिली आहे. 

सध्यातरी वैज्ञानिकावरील हत्येची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही. इस्त्रायलनेदेखील यावर काही बोलण्यास नकार दिला आहे. फखरीजादेह यांना द फादर ऑफ इरानियन बॉम्ब असे म्हटले जाते. ॉ

अमेरिकेचे आरोपअमेरिकेतील एका एक वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, की या वर्षाच्या अखेरपर्यंत इराणजवळ अण्वस्त्र तयार करण्यासाठी मुबलक सामग्री पोहोचू शकते. मात्र, इराण अण्वस्त्र तयार करण्याचा प्रयत्न करत असल्याचे अधिकृतपणे नाकारतो. राण उत्तर कोरियाच्या साथीने लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र तयार करण्याच्या कामाला लागला आहे. उत्तर कोरिया इराणला अण्वस्त्र तयार करण्यासाठी आवश्यक असणारे महत्वाचे साहित्य पुरवणार आहे. या दोन्ही देशांनी अण्वस्त्र तयार करण्याच्या कामाला नेमकी केव्हापासून सुरुवात केली, यासंदर्भात अमेरिकेने माहिती दिलेली नाही. अमेरिकन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे, की 2015ला करार झाला असतानाही, इराणचा अण्वस्त्र मिळवण्याचा प्रयत्न आहे. या करारात, इराणने अणू कार्यक्रम थांबवल्यास त्याला जागतीक बाजारपेठेत प्रवेश दिला जाईल, असे ठरले होते. पण, डोनाल्ड ट्रम्प यांनी 2018 मध्ये हा करार रद्द करून इराणवर निर्बंध लादले होते. अमेरिकेने याच वर्षी जानेवारी महिन्या एअर स्ट्राईक करून इराणचा मिलिट्री जनरल कासिम सुलेमानीची हत्या केली होती.

टॅग्स :Iranइराणnuclear warअणुयुद्धIsraelइस्रायल