शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

असीम मुनीरकडे पंतप्रधान आणि राष्ट्रपतींपेक्षा जास्त पॉवर; UN ने आरसा दाखवताच पाकिस्तानचा तीळपापड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 20:59 IST

पाकिस्तानने 27व्या घटनादुरुस्तीने सैन्यप्रमुख असीम मुनीरची पॉवर मोठ्या प्रमाणात वाढवली आहे.

United Nations: पाकिस्तान सरकारने अलीकडेच केलेल्या 27व्या घटनादुरुस्तीने आर्मी चीफ असीम मुनीरची पॉवर मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. यावर संयुक्त राष्ट्रांचे मानवाधिकार उच्चायुक्त वोल्कर टर्क यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यांनी म्हटले की, ही दुरुस्ती न्यायव्यवस्थेच्या स्वायत्ततेला गंभीरपणे कमकुवत करते. दरम्यान, त्यांच्या या टिप्पणीने पाकिस्तानचा तिळपापड झाला असून, यावर परराष्ट्र मंत्रालयाने आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.

यूएनच्या टीकेवर पाकिस्तानची प्रतिक्रिया

वोल्कर टर्क यांनी जिनिव्हातून जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, 27वी दुरुस्तीही 26व्या दुरुस्तीप्रमाणेच कायदेशीर तज्ज्ञ, समाज किंवा विरोधकांशी कोणतीही चर्चा न करता त्वरित आणि घाईत मंजूर करण्यात आली. या बदलामुळे न्यायपालिकेची ताकद कमी झाली असून, सेनेच्या उत्तरदायित्वाबाबत चिंता वाढल्या आहेत. या प्रतिक्रियेनंतर पाकिस्तान संतप्त झाला आहे. 

पाक परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, पाकिस्तान, संयुक्त राष्ट्र मानवाधिकार प्रमुखांच्या त्या शंकांवर तीव्र आक्षेप घेतो. हे दुरुस्ती विधेयक संसदेत दोन-तृतीयांश बहुमताने मंजूर झाले आहे. कायदे करणे किंवा संविधानात बदल करणे हे लोकांच्या निवडून दिलेल्या प्रतिनिधींचे अधिकार क्षेत्र आहे. यूएनच्या निवेदनात जमीनी वास्तवाचा अभाव आहे. संविधानातील सर्व प्रक्रियांचे योग्य पालन करूनच बदल करण्यात आले आहे.

सरकारने दावा केला की, ते संविधानानुसार मानवाधिकार, नागरिकांचे स्वातंत्र्य आणि कायद्याच्या राज्याबद्दल कटिबद्ध आहे. परराष्ट्र मंत्री इशाक डार यांच्या कार्यालयाने याबाबत आंतरराष्ट्रीय संस्थांकडून निर्णयाचा आदर करण्याची विनंतीदेखील केली.

या विधेयकात काय?

पाकिस्तानच्या 27व्या दुरुस्तीत दोन प्रमुख बदल वादग्रस्त ठरले आहेत.

संघीय संवैधानिक न्यायालय (Federal Constitutional Court) स्थापन करून विद्यमान न्याययंत्रणेत मोठा बदल.

आर्टिकल 243 मध्ये सुधारणा, ज्यामुळे पाकिस्तानमध्ये आर्मीची भूमिका अधिक प्रभावशाली झाली आहे.

यामुळे आर्मी चीफ असीम मुनीरला Chief of Defence Forces ही सर्वोच्च जबाबदारी देण्यात आली आहे, जी पाक सशस्त्र दलांतील सर्वात वरची पायरी मानली जाते.

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan's fury as UN questions army chief's power surge via amendment.

Web Summary : UN raised concerns over Pakistan's amendment boosting army chief's power, impacting judicial independence. Pakistan reacted strongly, defending the amendment as democratically approved and within constitutional norms, asserting commitment to human rights.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ