शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

चीननं सैन्य पाठवण्याची धमकी देताच पाकिस्तानला धडकी भरली, शहबाज शरीफ थेट दासूत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 09:40 IST

यासंदर्भात, आपल्या नागरिकांच्या संरक्षणासाठी पाकिस्तानात सैन्य पाठविण्याची चीनची इच्छा असल्याचे पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी खैबर पख्तुनख्वा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच चिनी अभियंत्यांचा मृत्यू झाला होता. यामुळे चीन जबरदस्त संतापला आहे. जर पाकिस्तान चिनी नागरिकांचे संरक्षण करण्यात असमर्थ असेल तर आम्ही स्वतः करू, अशा शब्दात चीननेपाकिस्तानला सुनावले आहे. यासंदर्भात, आपल्या नागरिकांच्या संरक्षणासाठी पाकिस्तानात सैन्य पाठविण्याची चीनची इच्छा असल्याचे पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. यानंतर आता, आपले सरकार पाकिस्तानात काम करणाऱ्या चिनी नागरिकांचे कोणत्याही परिस्थितीत संरक्षण करेल, असे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सोमवारी म्हटले आहे.

चीन नाराज - खैबर पख्तुनख्वामधील बेशम भागात 26 मार्च रोजी आत्मघाती हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेल्या वाहनाच्या सहाय्याने चिनी अभियंत्यांच्या ताफ्याला लक्ष्य केले. या हल्ल्यात पाच चिनी अभियंते आणि त्यांच्या पाकिस्तानी ड्रायव्हरचा मृत्यू झाला. सर्व चिनी नागरिक दासू जलविद्युत प्रकल्पात काम करत होते. चिनी नागरिकांचा एक चमू इस्लामाबादहून दासूकडे जात असताना हा हल्ला झाला. या घटनेच्या चौकशीसाठी पाकिस्तानने एक समितीही स्थापन केली होती. मात्र, त्यावर चीनला विश्वास नव्हता. यामुळे चीनने स्वतःचे एक तपास पथक पाठवले. या पथकाने, पाकिस्तानकडून सुरक्षिततेसंदर्भात राहिलेल्या त्रुटींमुळे दहशतवाद्यांना हा हल्ला करण्याची संधी मिळाली, असा दावा केला आहे.

शाहबाज शरीफ दासूत -चीनकडून वारंवार होणाऱ्या अपमानानंतर, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ सोमवारी दासूत पोहोचले आणि तेथील चिनी कामगारांना धीर देण्याचा प्रयत्न केला. उर्जा प्रकल्पात काम करणाऱ्या चिनी नागरिकांसोबत संवाद साधताना शरीफ म्हणाले, 26 मार्चच्या दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा दिली जाईल. तसेच भविष्यात अशा प्रकारचे हल्ले होणार नाही, याची काळजी पाकिस्तान सरकार घेईल. एवढेच नाही, तर हा दहशतवादी हल्ला म्हणजे, पाकिस्तान आणि चीनच्या मैत्रीला नुकसान पोहचवण्याचा प्रयत्न असल्याचे शरीफ यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानchinaचीनTerrorismदहशतवादXi Jinpingशी जिनपिंग