शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

इथिओपियामध्ये सत्तापालटाचा प्रयत्न; सेनाध्यक्षासह प्रांताध्यक्षाची गोळी झाडून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 22:21 IST

इथिओपियामध्ये सेनाध्यक्षांसह अमहारा प्रांताच्या अध्यक्षाची वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

इथिओपियामध्ये सेनाध्यक्षांसह अमहारा प्रांताच्या अध्यक्षाची वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दोन्ही हल्ले अमहारामध्ये सत्तापालट करण्यासाठी करण्यात आले होते. या हल्ल्यात एकूण चार जण ठार झाले आहेत. तेथील पंतप्रधान कार्यालयाने सत्ता उलथवून टाकण्याचा प्रयत्न अपयशी ठरल्याचे सांगितले आहे. 

पहिल्या हल्ल्यामध्ये अमहाराचे अध्यक्ष एंबाचेव मेकॉनन यांच्यासह सल्लागाराची हत्या करण्यात आली. त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यात या प्रांताचे महाधिवक्ता गंभीर जखमी झाले आहेत. हा हल्ला अमहाराची राजधानी बहिर डारमध्ये झाला. दुसऱ्या हल्ल्यामध्ये इथिओपियाच्या सेनेचे प्रमुख सियरे मेकोनेन आणि एक निवृत्त जनरल यांना आदिस अबाबा येथील निवासस्थानी अंगरक्षकाने गोळ्या झाडल्या. पंतप्रधान कार्यालयाने दोन्ही घटनांना एकमेकांशी संबंध असल्याचे सांगितले आहे. 

दोन्ही घटनांना अमहारा प्रांतातील सुरक्षा प्रमुख जनरल असमन्यू सीज जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे. त्यांनीच सत्ता उलथविण्याचा प्रयत्न केला होता. सध्या ते कुठे आहेच याबाबत यंत्रणांना काहीच माहिती नाही. असमन्यू यांनी याआधीही असेच प्रयत्न केले होते. त्यांना यामुळे अटकही करण्यात आली होती. मात्र, नंतर त्यांना माफ करण्यात आले आणि एक वर्षानंतर सोडून देण्यात आले होते.  

टॅग्स :Murderखून