शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

किम जोंग यांच्या प्रकृतीबाबत तर्कवितर्कांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 05:34 IST

38 नॉर्थया उत्तर कोरियाबाबत अध्ययन करणा-या वेबसाइटने ही छायाचित्रे जारी केली आहेत. यातून किम यांच्या प्रकृतीबाबत मात्र काहीही संकेत मिळत नाहीत.

सियोल : उत्तर कोरियाचे नेते किम जोंग ऊन हे सध्या कुठे आहेत आणि त्यांची प्रकृती कशी आहे? याबाबत सध्या तरी कोणीही ठामपणे काहीसांगू शकत नाही. त्यांच्या प्रकृतीबाबत तर्कवितर्क केले जात असताना त्यांची रेल्वे आठवड्यापासून देशाच्या पूर्व किनाऱ्यालगत त्यांच्या परिसरात उभी असलेली दिसून आली होती. 38 नॉर्थया उत्तर कोरियाबाबत अध्ययन करणा-या वेबसाइटने ही छायाचित्रे जारी केली आहेत. यातून किम यांच्या प्रकृतीबाबत मात्र काहीही संकेत मिळत नाहीत. मात्र, यातून दक्षिण कोरियाच्या गुप्तचर समितीच्या विधानाला पुष्टी मिळते की, किम हे राजधानी प्योंगयांगच्या बाहेरील भागात आहेत. उत्तर कोरियाने मात्र किम यांची प्रकृती खराब असल्याचे वृत्त यापूर्वीच फेटाळून लावले आहे. 15 एप्रिल रोजी आयोजित कार्यक्रमात किम सहभागी झाले नाहीत. उत्तर कोरियाचे संस्थापक आणि आपले आजोबा किम इल सुंग यांच्या १०८ व्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला होता. किम यांच्या आरोग्याचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण, अशीही काळजी आहे की, ते गंभीर आजारी पडल्याने किंवा काही वाईट घटना घडल्याने उत्तर कोरियात अस्थिरता निर्माण होऊ शकते. 21 एप्रिल रोजी किम यांची रेल्वे पूर्व किना-यालगत पोहोचली आणि २३ एप्रिलपर्यंत तिथेच होती, असे या वेबसाईटने म्हटले आहे. मात्र, यावरून किम तिथेच आहेत, असेही छातीठोकपणे म्हणता येत नाही.

टॅग्स :north koreaउत्तर कोरियाKim Jong Unकिम जोंग उन