शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

दैव बलवत्तर म्हणून..! ऐनवेळी जाम झाली बंदूक; थोडक्यात वाचल्या अर्जेंटिनाच्या उपराष्ट्रपती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 15:16 IST

अर्जेंटिनाच्या उपराष्ट्रपती क्रिस्टीना फर्नांडीज डी किर्चनर यांच्यावर भररस्त्यात गोळीबाराचा अयशस्वी प्रयत्न झाला आहे.

गेल्या महिन्यात जापानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. असाच प्रकार अर्जेंटिनाच्या उपराष्ट्रपतीसोबत घडला आहे. गुरुवारी एका व्यक्तीने अर्जेंटिनाच्या उपराष्ट्रपती क्रिस्टीना फर्नांडीज डी किर्चनर यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने बंदुक जाम झाली आणि क्रिस्तीना यांचा जीव वाचला. या हल्ल्याच्या प्रयत्नामुळे अर्जेंटिनाचे राजकीय वातावरण तापले आहे. 

राष्ट्राध्यक्ष अल्बर्टो फर्नांडिस यांनी टीव्हीवर देशाला संबोधित करताना सांगितले की, एका व्यक्तीने उपराष्ट्रपती क्रिस्टिना यांच्याकडे पिस्तूल दाखवून ट्रिगर खेचला. पण, गोळी बंदुकीतून बाहेर आलीच नाही आणि क्रिस्टीना यांचा जीव वाचला. अर्जेंटिनामध्ये लोकशाही परत आल्यापासूनची ही सर्वात गंभीर घटना असल्याचे त्यांनी सांगितले. अर्जेंटिनाच्या उपराष्ट्रपतींवर सध्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. हा हल्ला झाला तेव्हा त्यांचे शेकडो समर्थक त्यांच्या ब्युनोस आयर्स निवासस्थानाबाहेर जमले होते.

आरोपी मूळचा ब्राझीलचा होतान्यूज एजन्सी रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, क्रिस्तीना फर्नांडीज आपल्या समर्थकांना अभिवादन करत असताना, एका व्यक्तीने त्यांच्या दिशेने बंदूक दाखवली. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर 35 वर्षीय ब्राझिलियन वंशाचा आहे. या घटनेनंतर आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आणि शस्त्रही जप्त करण्यात आले.

फर्नांडिस डी किर्चनर यांच्यावर अनेक आरोप2007 ते 2015 दरम्यान दोनदा अर्जेंटिनाच्या अध्यक्ष बनलेल्या किर्चनर यांची फुटीरतावादी राजकारणी म्हणून ओळख आहे. त्यांना 12 वर्षे तुरुंगवास आणि 2000 च्या दशकाच्या सुरुवातीस केलेल्या सार्वजनिक करारासाठी निवडणूक न लढवण्याच्या अपात्रतेचा सामना करावा लागला होता. पुढील सार्वत्रिक निवडणुकीत फर्नांडिस डी किर्चनर या अध्यक्षपदाच्या प्रबळ दावेदार आहेत. उपराष्ट्रपतींच्या हत्येच्या प्रयत्नाचा अनेक देशांच्या प्रमुखांनी निषेध केला आहे. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयCrime Newsगुन्हेगारी