शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आमच्याकडे या, स्मार्टफोन बनवा! पाकिस्तानचे Appleला निमंत्रण! सॅमसंग तर आधीच गेलीय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 14:58 IST

Apple Manufacturing in Pakistan : पाकिस्तानने ऍपल आणि सॅमसंगला देशात प्लांट उभारण्याचे निमंत्रण दिले आहे. पण आर्थिक संकट आणि करांच्या बोजामुळे हे शक्य होईल का? वाचा विशेष रिपोर्ट.

इस्लामाबाद: पाकिस्तानने आपल्या देशात मोबाईल उत्पादनाला चालना देण्यासाठी आता जागतिक दिग्गज कंपन्या ऍपल आणि सॅमसंग यांना अधिकृतपणे निमंत्रण दिले आहे. पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या सरकारने 'मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरण उत्पादन धोरण २०२६-३३ अंतिम केले असून, याद्वारे पाकिस्तानला मोबाईल मॅन्युफॅक्चरिंगचे प्रादेशिक हब बनवण्याचे स्वप्न पाहिले जात आहे.'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

पाकिस्तानच्या इंजिनिअरिंग डेव्हलपमेंट बोर्डाने तयार केलेल्या या नव्या धोरणानुसार, परदेशी कंपन्यांना पाकिस्तानात प्लांट उभारण्यासाठी आकर्षित केले जाणार आहे. स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि परकीय गुंतवणूक वाढवणे, जुन्या किंवा रिफर्बिश्ड मोबाईलची पुनर्निर्यात करून वार्षिक ३०० ते ४०० दशलक्ष डॉलर्स महसूल मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी स्थानिक पातळीवर सुटे भाग तयार करणाऱ्या कंपन्यांना विशेष कर सवलती दिल्या जाणार आहेत.

सॅमसंगची उपस्थिती आणि ऍपलचे आव्हानसॅमसंगने याआधीच स्थानिक कंपन्यांच्या भागीदारीतून पाकिस्तानात असेंब्ली सुरू केली आहे, मात्र ती अजूनही पूर्णपणे 'मॅन्युफॅक्चरिंग' स्तरावर पोहोचलेली नाही. दुसरीकडे, ऍपलसाठी पाकिस्तान हा एक कठीण बाजार आहे. पाकिस्तानात आयफोनवर प्रचंड आयात शुल्क असल्याने सॅमसंगच्या तुलनेत ऍपलची किंमत तिथे खूप जास्त आहे. यामुळेच ऍपल पाकिस्तानात प्लांट उभारणार का, याबाबत तज्ज्ञांमध्ये साशंकता आहे.

खरोखरच चित्र बदलेल का?पाकिस्तानात सध्या ९५% मोबाईलची विक्री स्थानिक असेंब्लीच्या मोबाईलची होत आहे. या मोबाईलमधील बहुतांश भाग चीनमधून आयात केले जातात. डॉलरची वाढती किंमत आणि परकीय चलनाचा तुटवडा ही मोठी अडचण आहे. मोबाईलवर १८% ते २०% विक्री कर लावल्याने उत्पादनात घट झाली आहे. वीज टंचाई आणि कच्च्या मालाची उपलब्धता यांवर पाकिस्तानला अजून खूप काम करावे लागणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan Invites Apple to Manufacture Smartphones; Samsung Already Present

Web Summary : Pakistan aims to become a mobile manufacturing hub, inviting Apple and Samsung. Samsung already assembles phones, but Apple faces challenges due to high import taxes. Pakistan hopes to boost local production and attract foreign investment, despite economic hurdles.
टॅग्स :Apple IncअॅपलPakistanपाकिस्तान