Donald Trump Tariffs China News: रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवल्यास टॅरिफ वाढवू, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशारा वजा धमकीला चीनने जशास तसे उत्तर दिले. 'टॅरिफ युद्धामध्ये कोणीही विजेता होऊ शकत नाही. आम्ही आमची सुरक्षा सार्वभौमत्व आणि विकासाच्या हिताची पूर्ण ताकदीने संरक्षण करू', अशा शब्दात चीनने अमेरिकेला ठणकावले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेकडून भारत, चीन आणि ब्राझील या देशांवर रशियाकडून तेल खरेदी करू नका, यासाठी दबाव आणला जात आहे. काही दिवसांपूर्वी नाटोच्या महासचिवांनीही याचसंदर्भात तिन्ही देशांनी पुतीन यांच्यावर दबाव आणून युक्रेनवरील हल्ले थांबवावेत अशा आशयाचे विधान केले होते.
चीन रशियाकडून तेल आयात करतो. चीनने तेल आयात कायम ठेवली तर त्यांच्यावरील टॅरिफ वाढवू असा इशारा अमेरिकेने अर्थात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता. त्याला आता चीननेही त्याच भाषेत उत्तर दिले आहे.
बळजबरी आणि दबावाने काही साध्य होणार नाही
चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने एक्स सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट केली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, "चीन नेहमीच आपल्या राष्ट्रीय हितांनुसार ऊर्जा आयात निश्चित करेन. टॅरिफ युद्धात कोणीही विजेता होऊ शकत नाही. बळजबरी आणि दबावाने काहीही साध्य करता येणार नाही."
"चीन आपले सार्वभौमत्व, सुरक्षा आणि विकासाचे हित यांचे पूर्ण ताकदीने संरक्षण करेन", अशा शब्दात चीनने अमेरिकेला सुनावले आहे.
ट्रम्प यांचा भारताला झटका! १ ऑगस्टपासून २५ टक्के टॅरिफ
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्याची भीती होती, तो झटका दिलाच. ट्रम्प यांनी १ ऑगस्टपासून भारतावर २५ टक्के टॅरिफ लागू करत असल्याची घोषणा केली. रशियाकडून तेल आणि ऊर्जा खरेदी करत आहे. भारतावर दंडासह १ ऑगस्टपासून २५ टक्के टॅरिफ लागू करत आहे, असे ट्रम्प म्हणाले.