शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukrain War: युक्रेनला अँटी रेडिएशन पिल्सचा पुरवठा होऊ लागला? अण्वस्त्र हल्ला, अपघातापासून वाचविण्याचे प्रयत्न सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 14:05 IST

अणुदुर्घटना किंवा अणुहल्ला झाला तर त्यातून रेडिएशन निघते. अणुहल्ला झालाच तर त्यातून वाचणे जवळपास अशक्य असते.

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेले युद्ध सहा महिने झाले तरी निर्णायक वळणावर आलेले नाहीय. यामुळे रशिया आता अण्वस्त्र हल्ले सुरु करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे युरोपियन युनियन युक्रेनला अँटी रेडिएशन औषधे पाठवू लागला आहे. 

युक्रेनचा सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प अजूनही रशियन सैन्याच्या ताब्यात आहे. युरोपातील सर्वात मोठा झापोरिझ्झ्या न्यूक्लियर प्लांट (झापोरिझ्झिया) युद्ध सुरू झाल्यानंतर अवघ्या एका आठवड्यानंतर रशियन सैन्याने ताब्यात घेतला. रशियन सैन्याच्या ताब्यात असल्यामुळे तिथे अपघात किंवा रेडिएशन लीक होण्याचा धोका नेहमीच असणार आहे. युक्रेनला रेडिएशनविरोधी औषधाचे ५५ लाख डोस पाठवले जात आहेत. युरोपियन युनियनने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून म्हटले आहे की, अणु अपघाताची भीती लक्षात घेऊन 5.5 दशलक्ष पोटॅशियम आयोडाइड गोळ्या युक्रेनला पाठवण्यात येत आहेत. यापैकी 50 लाख युरोपियन युनियनला आणि 5 लाख ऑस्ट्रियाला पाठवले जात आहेत. त्याची किंमत 5 लाख युरो आहे. 

अणुदुर्घटना किंवा अणुहल्ला झाला तर त्यातून रेडिएशन निघते. अणुहल्ला झालाच तर त्यातून वाचणे जवळपास अशक्य असते. अणुदुर्घटना झाली आणि किरणोत्सर्गाची गळती झाली तर त्यापासून बचाव करता येईल. हे औषध पोटॅशियम आयोडाइड आहे, जे शरीरातून किरणोत्सर्गी आयोडीन जाण्यास विरोध करते. थायरॉईड ग्रंथी प्रतिबंधीत होतात. किरणोत्सर्गी आयोडीन आत प्रवेश करू शकत नाही. किरणोत्सर्गी आयोडीन हे बाहेरून शरीरावर जमा होऊ लागते. साबण किंवा कोमट पाण्याने ते धुता येते. यामुळे बाहेरून किरणोत्साराचा परिणाम त्वचेवर जाणवत नाही. 

 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्ध