शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

मांजरीवर संसर्गाविरोधाचे औषध कोरोनावर उपयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2020 02:51 IST

संशोधनातील माहिती : मनुष्यावर चाचणी करण्याची मागितली परवानगी

वॉशिंग्टन : जगभरात कोरोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या ४ लाखांहून अधिक आहे. अमेरिकेला याचा सगळ्यात मोठा फटका बसला आहे. यावर औषध शोधण्यासाठी जगभरातील संशोधत प्रयत्न करीत आहेत. अशातच एक दिलासा देणारी बाब समोर आली आहे. मांजरीमधील संसर्गजन्य आजारांवर वापरले जाणारे एक औषध माणसांमधील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपयुक्त ठरू शकते, असे एका संशोधनातून समोर आले आहे.

जीसी-३७६ असे या औषधाचे नाव आहे. हे कोरोनाविरोधात प्रभावी ठरत असल्याचे प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत दिसून आले आहे. हे औषध तयार करणाऱ्या अमेरिकेतील अ‍ॅनिव्हाइव्ह लाइफ सायन्सेस या कंपनीने तेथील अन्न आणि औषध प्रशासनाकडे याची मनुष्यावर चाचणी करण्याची परवानगी मागितली आहे. या संशोधनाचे नेतृत्व करणारे झांग शुआंग यांनी सांगितले की, संगणकीय मॉडेल आणि प्रयोगशाळेत केलेल्या परीक्षणाच्या आधारे जीसी-३७६ या औषधांचा परिणाम चांगला झाल्याचे आढळले. हे औषध सुरक्षित आहे. कोरोनाचा संसर्ग ज्यामुळे होतो त्या एन्झाइमला हे औषध बांधून ठेवते. हे एन्झाइम पेशीतील प्रोटिनला तोडण्याचे काम करते. यातून तयार झालेल्या अमिनो अ‍ॅसिडचा वापर कोरोना विषाणू त्याच्या वाढीसाठी करीत असतो. हे औषध कोरोना विषाणूने बाधित पेशीपर्यंत सहजपणे पोहचू शकते. मात्र कोरोनाबाधित व्यक्तीवर हे कधी वापरलेजाणार याबाबत माहिती मिळू शकली नाही. (वृत्तसंस्था)

टॅग्स :MumbaiमुंबईWashington Sundarवॉशिंग्टन सुंदर