शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

बशर यांना आणखी एक धक्का, सीरियातील सत्ता जाताच पत्नीनंही सोडली साथ! घटस्फोटासाठी रशियात अर्ज दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 13:01 IST

रशियन अधिकाऱ्यांनी त्यांची संपत्ती आणि पैसेही जप्त केली आहेत. त्यांच्या संपत्तीत 270 किग्रा सोनं, 2 अब्ज डॉलर आणि मॉस्कोमध्ये 18 अपार्टमेंट्सचा समावेश आहे.

सीरियातील सत्तापालटानंतर पदच्युत राष्ट्रपती बशर अल-असद आपल्या कुटुंबासह रशियात पळून गेले आहेत. यातच आता त्यांच्यासाठी आणखी एक वाईट आणि धक्कादायक बातमी आहे. तुर्की आणि अरब मीडियाने रविवारी दिलेल्या वृत्तानुसार, पदच्युत राष्ट्रपती बशर अल-असद यांची ब्रिटिश पत्नी अस्मा अल-असद यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यांना रशियात राहायचे नाही. त्या घटस्फोटानंतर लंडनला जाणार असल्याचे बोलले जात आहे.

जेरुसलेम पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, अस्मा यांनी रशियन कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. याच वेळी त्यांनी मॉस्को सोडण्यासंदर्भातही विशेष परवानगी मागितली आहे. त्यांच्या अर्जाचे रशियातील संबंधित अधिकाऱ्यांकडून मूल्यांक केले जात आहे. बीबीसीच्या वृत्तानुसार, अस्मा यांच्याकडे ब्रिटिश आणि सीरियन नागरिकत्व आहे. त्यांचा जन्म आणि पालन-पोषण लंडनमध्येच सीरियन पालकांनी केले. अस्मा 2000 मध्ये सीरियाला गेल्या आणि तेथेच वयाच्या 25 व्या वर्षी त्यांनी असद यांच्यासोबत लग्न केले होते.

रशियानं फ्रिज केलीय असद यांची संपत्ती -सध्या असद रशियामध्ये आहेत. मात्र त्यांच्यावर अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यांना मॉस्को सोडण्याची अथवा कुठल्याही राजकीय कार्यात भाग घेण्याची परवानगी नाही. रशियन अधिकाऱ्यांनी त्यांची संपत्ती आणि पैसेही जप्त केली आहेत. त्यांच्या संपत्तीत 270 किग्रा सोनं, 2 अब्ज डॉलर आणि मॉस्कोमध्ये 18 अपार्टमेंट्सचा समावेश आहे. 

टॅग्स :Syriaसीरियाrussiaरशियाhusband and wifeपती- जोडीदार