शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानात गेलेली अंजू भारतात परत येणार! कधी अन् का.. वाचा तिनेच दिलेलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 17:58 IST

अंजू काही महिने पाकिस्तानात राहून भारतात परणार असल्याचे बोलले जात आहे

Anju in Pakistan: भारतीय महिला व राजस्थानची रहिवासी असलेली अंजू पती आणि मुलांना सोडून यावर्षी पाकिस्तानात गेली होती. तिथे गेल्यानंतर तिने पाकिस्तानच्या नसरुल्लाला भेटायला आल्याचे सांगितले. नसरुल्लाला ती फेसबुकवर भेटली आणि प्रेमात पडल्याचे अंजूने मान्य केले. त्यानंतर तिने पाकिस्तानला जाण्याचा निर्णय घेतला होता. पण आता मात्र अंजू काही महिने पाकिस्तानात राहून भारतात परणार असल्याचे बोलले जात आहे.

अंजू भारतात परतणार... का आणि कधी?

अंजू ऑक्टोबरच्या अखेरीस भारतात परतणार असल्याचे सांगितले जात आहे. अंजूशी झालेल्या संवादाच्या आधारे ती भारतात येणार असल्याचा दावा केला जात आहे. आपल्या मुलांसाठी ती भारतात परतत असल्याचे अंजूने म्हटलं आहे. लोकांचे अनेक प्रश्न आहेत आणि भारतात परतल्यानंतर ती सर्व प्रश्नांची उत्तरे देईल, असे तिने सांगितले. अंजूने सांगितले की तिची पाकिस्तानमधील व्हिसाची मर्यादा संपुष्टात येत आहे आणि ती व्हिसाची कालमर्यादा वाढवू इच्छित नाही. तिची मुलं हे त्यामागचे कारण आहे. तिला भारतात परतायचे आहे आणि मुलांसोबत राहायचे आहे. ती फक्त मुलांसाठी येत आहे, असे तिने सांगितले आहे.अंजू म्हणते की तिने कधीही कोणापासून काहीही लपवलेले नाही. पाकिस्तानात पोहोचल्यावर सगळ्यात आधी मी माझ्या बहिणीला फोन केला. आई-वडिलांशीही बोललो. माझ्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. ती म्हणाली की ती देशाच्या सुरक्षा एजन्सी आणि पोलिसांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईल. अंजू म्हणाली की तिचा हेतू चुकीचा नव्हता. पाकिस्तानात आल्यावर ती पूर्णपणे कायदेशीररित्या आली. अंजू भारतात आल्यानंतर काही मोठे खुलासेदेखील करणार आहे.

काय आहे अंजूची कहाणी?

मूळची उत्तर प्रदेशची असलेल्या अंजूचे 2007 मध्ये राजस्थानमध्ये लग्न झाले. ३४ वर्षीय अंजूला दोन मुले आहेत. यावर्षी अंजू सोशल मीडियावर खैबर पख्तुनख्वा प्रांतातील नसरुल्लाच्या प्रेमात पडली आणि व्हिसावर पाकिस्तानात पोहोचली. अंजूने परदेशात नोकरीच्या नावाखाली दोन वर्षांपूर्वी पासपोर्ट बनवला होता आणि त्यानंतर या वर्षी ती शांतपणे पाकिस्तानचा व्हिसा मिळवून निघून गेली. अंजू पाकिस्तानात गेल्यानंतर दोन्ही देशांच्या मीडियामध्ये ती प्रसिद्ध झाली. पाकिस्तानातील अनेक बडे व्यापारीही तिला भेटायला आले असल्याचे सांगितले गेले होते.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत