शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

"काय करावं समजत नाही"; अंजूशी लग्न केल्यावर पाकिस्तानच्या नसरुल्लाहचं आयुष्य झालं नरक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 16:48 IST

अंजू विवाहित असून तिला दोन मुलं आहेत. तिने इस्लाम धर्म स्वीकारला असून आता फातिमा असं नवीन नाव असल्याचा दावा पाकिस्तानी मीडिया करत आहे.

सध्या पाकिस्तानच्या मीडियामध्ये भारतातील एका महिलेच्या नावाची चर्चा आहे. ते नाव म्हणजे अंजू. कुटुंबीयांशी खोटं बोलून अंजू तिच्या फेसबुक फ्रेंडला भेटण्यासाठी पाकिस्तानात गेली. अंजू विवाहित असून तिला दोन मुलं आहेत. तिने इस्लाम धर्म स्वीकारला असून आता फातिमा असं नवीन नाव असल्याचा दावा पाकिस्तानी मीडिया करत आहे. तसेच ती ज्या फेसबुक फ्रेंडला भेटायला आली होती त्याच्याशी निकाह केला आहे. अंजूच्या येण्याने नसरुल्लाह आणि त्यांच्या कुटुंबाचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले.

अंजू आणि नसरुल्लाह हे सध्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील अपर दीर ​​भागात आहेत, इस्लामाबादहून पोहोचण्यासाठी पाच ते सहा तास लागतात. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, अंजू इथे का आली आणि तिच्या लग्नाच्या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे, याविषयी नसरुल्लाहशी बोललं असता, तो खूप संतापलेला आणि नाराज दिसत होता. काय करावे हेच कळत नसल्याचं त्याने सांगितलं. नसरुल्लाहने माध्यमांशी बोलण्यास नकार दिला आहे.

रिपोर्टनुसार, अपर दीरचे जिल्हा पोलीस अधिकारी मोहम्मद मुश्ताक म्हणाले, 'अंजू नसरुल्लाहसोबत असून तिला सुरक्षा देण्यात आली आहे. अंजूला २१ ऑगस्टपूर्वी पाकिस्तान सोडावे लागेल, असे नसरुल्लाहला सांगण्यात आले आहे. अंजू जाईल त्यावेळी नसरुल्लाहला याची माहिती पोलिसांना द्यावी लागणार आहे. रिपोर्टनुसार, अंजू आणि नसरुल्लाहची गोष्ट समोर आल्यानंतर मीडिया आणि लोकांच्या परिसरातील लोकही हैराण झाले आहेत.

अंजूच्या येण्याने नसरुल्लाहच्या सामान्य जनजीवनावरही परिणाम झाला आहे. पण काही व्यावसायिक अंजूकडे पाहुणे म्हणून पाहत आहेत आणि महागड्या भेटवस्तू देऊन तिचे स्वागत करत आहेत. अलीकडेच पाकिस्तानातील दोन रिअल इस्टेट व्यावसायिकांनी अंजूला दोन प्लॉट भेट दिले आहेत. अंजू आणि नसरुल्लाह लवकरच एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा करू शकते, अशा बातम्या पाकिस्तानी माध्यमांमध्ये येत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान