शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

म्हणून या देशात प्राणी चालवतात राजकीय सत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 18:58 IST

जगभरात अनेक देशात अशा निवडणूका घेतल्या जातात ज्यात उमेदवार हे प्राणी असतात.

ठळक मुद्देलोकांवर सत्ता मिळवण्यासाठी राजकारणी कितीतरी क्लुप्त्या वापरत असतात. कित्येक देशात कुत्री-मांजरी शहर चालवत आहेत. अशाच काही हटके शहरांविषयी आज आपण पाहुया.

मुंबई : लोकांवर सत्ता मिळवण्यासाठी राजकारणी कितीतरी क्लुप्त्या वापरत असतात. मात्र प्रत्येकवेळी त्यांना यश येतंच असं नाही. सत्ता काबिज करण्यासाठी कितीतरी गोष्टींचा अवलंब केला जातो. पैशांचा पाऊस पाडावा लागतो, तरीही वर्षानुवर्षे कित्येकांना कोणतंच पद मिळत नाही. जगभरातील प्रत्येक देशात अशाच प्रकारचं राजकारण आहे. पण काही देशात विविध पातळीवर प्राणी सत्तेत असल्याचं तुम्हाला कोणी सांगितलं तर आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे. कित्येक देशात कुत्री-मांजरी शहर चालवत आहेत. अशाच काही हटके शहरांविषयी आज आपण पाहुया.

ड्यूक

युनायडेट स्टेटमधल्या मिन्नेसोटा या शहरात ड्यूक हा ९ वर्षांचा कुत्रा तब्बल ३ वेळा महापौर म्हणून निवडून आल्याचं तेथील सोशल मीडिया सांगते. मिन्नेसोटा या शहरातील कोरमरंटमध्ये हा कुत्रा महापौर आहे. एका कुत्र्याची निवड महापौर पदासाठी झाली तरी तेथील एकाही नागरिकाने याला विरोध केलेला नाही. 

स्टब्स

युनायटेड स्टेटमधील अलास्कामधील टॅल्कीना या गावात गेल्या पंधरा वर्षांपासून एक मांजर राज्य करते आहे. स्टब्स असं त्या मांजरीचं नाव असून १९९७ सालापासून ही मांजर पर्यटकांसाठीही आकर्षणाचा विषय ठरते आहे. 

बोस्को

कॅलिफोर्नियामधील सुनोल येथे बोस्को नावाचा एका कुत्र्याने तीन उमेदवारांना हरवून सत्ता काबीज केली होती. १९८१ पासून ते १९९४ पर्यंत या कुत्र्याने महापौराची गादी चालवली. मात्र १९९४ साली त्याचा मृत्यू झाला. या कुत्र्याचा पुतळाही सुनोलमधील पोस्ट ऑफिसजवळ लावण्यात आला आहे. 

पिगॉस

व्हिएतनाम वॉरचा निषेध करण्यासाठी राष्ट्रपतीपदासाठी युथ इंटरनॅशन पार्टीतर्फे एका डुक्कराला उमेदवारी देण्यात आली होती. 

गिग्गल्स

मिशिगनमधील फ्लिंट येथे एक डुक्कर महापौर म्हणून निवडून आलं होतं. पण इतर नेत्यांप्रमाणेच त्याच्याकडून शहराच्या विकासासठी कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक काम झालं नसल्याचे तेथील स्थानिक सांगतात.

ट्युक्सेडो स्टॅन

ट्यक्सेडो स्टॅन या मांजरी एका कॅनाडातील हॅलिफॅक्स येथील एका लेखकाने दत्तक घेतलं होतं. त्यानंतर या लेखकाने बेघर मांजरीसाठी एक संस्थाही स्थापन केली होती. त्यानंतर हेलिफॅक्स या गावात हे मांजर महापौरपदासाठी उभं राहिलं होतं. मात्र मांजर निवडून आलं नाही. पण तरीही हे मांजर त्या विभागत फार प्रसिद्ध आणि मान्यवरांपैकी एक आहे.

सौजन्य : www.dogwithblog.in

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयPoliticsराजकारण