शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अॅंजेला मर्केल सलग चौथ्यांदा जर्मनीच्या चॅन्सेलरपदी, आघाडी सरकारसाठी प्रयत्न करावे लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 13:46 IST

 अॅंजेला मर्केल यांनी चौथ्यांदा जर्मनीच्या चॅन्सेलरपदी निवडून येण्याचा बहुमान प्ताप्त केला आहे. रिववारी झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांना ख्रिश्चियन डेमोक्रॅटस (सीडीयू) पक्षाला 32.5 टक्के मते मिळाली आहेत.

ठळक मुद्देअॅंजेला मर्केल यांचा जन्म 17 जुलै 1954 साली हॅम्बर्ग येथे झाला.लिपझिश विद्यापिठात शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या 1989 पासून राजकारणामध्ये विविध पदांवरती आहेत.

बर्लिन, दि.25-  अॅंजेला मर्केल यांनी चौथ्यांदा जर्मनीच्या चॅन्सेलरपदी निवडून येण्याचा बहुमान प्ताप्त केला आहे. रिववारी झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांना ख्रिश्चियन डेमोक्रॅटस (सीडीयू) पक्षाला 32.5 टक्के मते मिळाली आहेत. मर्केल यांच्या प्रमुख विरोधक सोशालिस्ट डेमोक्रॅटसना केवळ 20 टक्के मते मिळाली आहेत. अत्यंत कडवा उजवा पक्ष मानल्या जाणाऱ्या अल्टर्नेटिव्ह फॉर दॉइचलॅंड (एएफडी)ला अपेक्षेपेक्षा मतांची जास्त टक्केवारी मिळालेली आहे. हिटलरच्या काळानंतर प्रथमच वंशवादी आणि परदेशी लोकांना विरोध करणारा पक्ष संसदेत आला आहे.

एफडीला मते मिळाल्यामुळे जर्मनीच्या मतदारांमधील असंतोषाला वाट मिळालीच आहे त्यातून अत्यंत विखारी व प्रखर विचार असणारा एक पक्ष संसदेत येऊन पोहोचला आहे. सीरियातून येणाऱ्या आश्रितांना या पक्षाने जोरदार विरोध केला आहे. इस्लामविरोधी पक्ष म्हणूनही त्यांची ओळख आहे. जर्मनीमध्ये मिनार नसावेत अशीही मागणी त्यांनी केली होती. या पक्षाला मतदान करणाऱ्या लोकांच्या चिंता व विचार समजून घेऊ आणि मार्ग काढण्याचा प्रयत्न करु असे मर्केल यांनी निवडणुकीनंतर सांगितले आहे. 

अॅंजेला मर्केल या नव्या आघाडी सरकारमुळे पुन्हा चॅन्सेलर होणार असल्या तरी त्यांच्या पक्षाचा जनाधार कोसळलेला दिसत असून त्यांची लोकप्रियताही घटल्याचे दिसत आहे. मर्केल यांचे प्रमुख विरोधक असणाऱ्या मार्टिन शुल्झ यांच्या सोशल डेमोक्रॅटिक पार्टी (एसपीडी) ला 20 टक्के मते मिळतील असे ओपिनियन पोलवरुन दिसत होतेच. ओपिनियन पोलचा विचार करता गेल्या काही महिन्यांमध्ये शुल्झ मर्केल यांच्यापेक्षा फारच पिछाडीवर असल्याचे दिसून आले होते. तीन आठवड्यांपुर्वी या दोघांमध्ये टीव्हीवर दाखवण्यात आलेली एकमेव थेट चर्चा झाली, त्यामध्ये शुल्झ यांच्यापेक्षा मर्केल अधिक प्रभावी असल्याचे स्पष्ट झाले होते. दुसऱ्या महायुद्धानंतर सोशल डेमोक्रॅटिकला ही सर्वात कमी मते मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

अॅंजेला मर्केल यांचा जन्म 17 जुलै 1954 साली हॅम्बर्ग येथे झाला. लिपझिश विद्यापिठात शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या 1989 पासून राजकारणामध्ये विविध पदांवरती आहेत. गेली 12 वर्षे त्या जर्मनीच्या चॅन्सेलर असून त्यांनी स्वतःच्या विशेष वेगळ्या धोरमांमुळे युरोपात आपला स्वतःचा ठसा निर्माण केला आहे.