शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

.. अन ओबामांना अश्रू अनावर झाले

By admin | Published: January 06, 2016 11:21 AM

अमेरिकेत काही दिवसांपूर्वी झालेल्या बेछूट गोळीबारात मृत्यूमुखी पडलेली बालके व वाढत्या हिंसाचाराच्या घटनामुळे व्यथित झालेल्या बराक आबोमांना अश्रू अनावर झाले

ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. ६ - अमेरिकेत काही दिवसांपूर्वी झालेल्या बेछूट गोळीबारामुळे काही लहानग्यांचा झालेला मृत्यू आणि वाढत्या हिंसाचाराच्या घटना यामुळे व्यथित झालेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना व्हाईट हाऊसमधील कार्यक्रमात अश्रू अनावर झाले. 
गेल्या काही महिन्यांत अमेरिकेत गोळीबाराच्या घटनेमुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांचे कुटुंबिय व्हाईट हाऊसमधील कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यावेळी बंदुकीमुळे होत असलेल्या हिंसाचाराबाबत ओबामा बोलत होते.  या कार्यक्रमात त्यांनी अमेरिकेतील शस्त्रांच्या सहज उपलब्धतेविषयी चिंता व्यक्त केली. ' बंदुकीच्या साहाय्याने होत असलेले हल्ले व त्यामुळे वाढणत जाणा-याहिंसाचारावर नियंत्रण मिळविण्याची गरज आहे, असे मत ओबामा यांनी व्यक्त केले. बंदुकीच्या गोळ्यांना बळी पडलेल्या मुलांचा मी  जेव्हा विचार करतो तेव्हा मला त्या विचाराने वेडे व्हायला होते, असे सांगणा-या  ओबामांच्या चेहऱ्यावरून अश्रू ओघळत होते. 
यावेळी ओबामांनी भविष्यात शस्त्र परवाने मिळविण्याचे नियम अधिक कडक करण्याविषयी सूतोवाच करत नागरिकांकडून शस्त्रास्त्रांचा होणारा वाढता वापर रोखण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले. 
अमेरिकेत गेल्या काही वर्षात झालेल्या गोळीबारामध्ये तब्बल दहा हजारांहून अधिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून त्याच पार्श्वभूमीवर ओबामा यांनी चिंता व्यक्त केली.