शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2024 06:07 IST

शहरातील सर्व गिफ्ट शॉप आणि रेस्टॉरंट पाहुण्यांसाठी केले बुक, जगभरातील ८०० सेलिब्रिटींची उपस्थिती 

पोर्टोफिनो (इटली) : उद्योगपती मुकेश अंबानी यांचे सुपु्त्र अनंत अंबानी हे राधिका मर्चंट यांच्यासोबत मुंबईत १२ जुलै रोजी विवाहबद्ध होत आहेत. या दोघांच्या दुसऱ्या प्री वेडिंगचे जोरदार सेलिब्रेशन इटलीमध्ये सुरू आहे. अखेरच्या दिवसाच्या सेलिब्रेशनसाठी शनिवारी ८०० हून अधिक सेलिब्रेटी इटलीतील पोर्ट सिटी पोर्टोफिनोमध्ये दाखल झाले. 

या कार्यक्रमाला ‘ला डोल्ले व्हिटा’ असे नाव दिले आहे. या इटालियन शब्दाचा अर्थ ‘गोड जगणे’ असा होतो. या कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी पोर्ट सिटीमधील सर्व २४ गिफ्ट शॉप आणि रेस्टॉरंट्स  बुक करण्यात आली आहेत. कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्यांखेरीज इथे अन्य कुणालाही प्रवेश करण्याची मुभा असणार नाही. येणाऱ्या पाहुण्यांना खास एक बॅग दिली जाणार आहे. याच्याच आधारे त्यांना शहरात प्रवेश दिला जाणार आहे. (वृत्तसंस्था) 

गायक आंद्रेया बोसिलेई यांचा खास परफॉर्मन्सप्रख्यात गायक आंद्रेया बोसिलेई आणि जगप्रसिद्ध व्हायोलनिस्ट अनास्तासिया पेट्रीशाक यांचाही खास परफॉर्मन्स सादर होणार आहे. स्थानिक नागरिकांना या कार्यक्रमात सहभागी होता येणार नाही. मोठेमोठे स्पिकर्स लावले असल्याने स्थानिक नागरिकांना हे सादरीकरण केवळ ऐकता येणार आहे. दुसऱ्या प्री-वेडिंग कार्यक्रमाच्या समारोपासाठी  पोर्टोफिनोमध्ये ग्रँड डिनर पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीमंतांचे शहर अशी या शहराची ओळख आहे. 

कॅटी पेरीच्या गाण्यावर थिरकले सर्व पाहुणेअनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या दुसऱ्या प्री-वेडिंगमध्ये शुक्रवारी जगप्रसिद्ध अमेरिकन गायिका कॅटी पेरीने परफॉर्मन्स केला. फ्रान्स येथील कान्समध्ये कॅटी पेरीचा रॉकिंग परफॉर्मन्स झाला.याचे व्हिडीओ समोर आले आहेत. कॅटी पेरीच्या गाण्यावर पाहुणे जबरदस्त नाचताना पाहायला मिळत आहेत. या परफॉर्मन्ससाठी अंबानींनी कॅटी पेरीला कोट्यवधी मानधन दिले आहे.

ओरीला उचलून नाचू लागला रणवीर सिंगया पार्टीचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात गुरू रंधावा स्टेजवर ‘आज फिर किथे चली है मोरनी बन के’ हे गाणे गात आहे. त्यावर अभिनेता रणवीर सिंग, वीर पहाडिया आणि ओरी नाचत आहेत. नाचताना रणवीर सिंग ओरीला उचलून घेतल्याचे दिसत आहे. इटली-फ्रान्सदरम्यान समुद्रात असेंट क्रूझवर पार्टी तीन दिवस चालली. 

टॅग्स :anant ambaniअनंत अंबानीmarriageलग्नItalyइटली