शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

भारतीयाने अमेरिकेत केला मोठा घोटाळा; गुंतवणूकदारांची ८ हजार कोटींची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 09:09 IST

ग्राहक आणि गुंतवणूकदारांकडून सतत होणाऱ्या पैशाच्या प्रवाहाने ऋषी आपले जीवन आरामात जगत होते.

शिकागो : भारतीय वंशाचे अमेरिकन उद्योगपती ऋषी शाह यांना अमेरिकेतील न्यायालयाने फसवणुकीच्या आरोपाखाली साडेसात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. शाह याने गुगल आणि गोल्डमन ग्रुपसारख्या बड्या कंपन्यांच्या गुंतवणूकदारांची तब्बल ८.३५ हजार कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. अमेरिकन कॉर्पोरेट इतिहासातील ही सर्वांत मोठी फसवणूक आहे.

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, ३८ वर्षीय शाह याने २००६ मध्ये आउटकम हेल्थ नावाची कंपनी स्थापन केली होती. ही कंपनी डॉक्टरांच्या कार्यालयात दूरचित्रवाणी लावायची आणि आरोग्यसेवा क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी जाहिराती देत असे. या कंपनीत श्रद्धा अग्रवाल ऋषीची सह-संस्थापक होती. २०१७ मध्ये गोल्डमन, अल्फाबेट आणि इलिनॉयचे गव्हर्नर प्रित्झकर यांनी आउटकम हेल्थ कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला. एप्रिल २०२३ मध्ये, शाह यांना १२ हून अधिक आरोपांमध्ये दोषी ठरवण्यात आले.

झपाट्याने नफा कमविला, मात्र...कंपनीच्या आकडेवारीनुसार, त्यांनी या व्यवसायात झपाट्याने नफा कमावला. २०१० पर्यंत आउटकम हेल्थ कंपनी या क्षेत्रात मोठे नाव म्हणून उदयास येऊ लागली. सुरुवातीच्या काळात कंपनीने अनेक मोठ्या ग्राहकांकडून पैसे घेतले. यामुळे शिकागोच्या कॉर्पोरेट जगतातील मोठ्या नावांमध्ये ऋषी शाह यांचा समावेश झाला. मात्र, एकीकडे ते झपाट्याने नफा कमवत असताना, दुसरीकडे ऋषी, श्रद्धा आणि कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी यांच्या गुंतवणूकदारांची आणि ग्राहकांची फसवणूक करण्याचा कट रचत होते.

खोटे बोलून घेतले पैसेतिघांनी मिळून वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्यांकडून पैसे घेतले आणि टीव्हीवर जाहिरात दिली नाही. याशिवाय त्यांनी कंपनीच्या नफ्याबाबत खोटे दावेही केले. नोवो नॉर्डिस्कसारख्या बड्या अमेरिकन औषध कंपन्यांचीही शहा यांनी फसवणूक केली. ग्राहक आणि गुंतवणूकदारांकडून सतत होणाऱ्या पैशाच्या प्रवाहाने ऋषी आपले जीवन आरामात जगत होते. तो अनेकदा परदेश दौऱ्यावर जात होता, त्याच्याकडे खासगी जेट आणि नौकाही होती. याशिवाय त्याने ८३ कोटी रुपयांचा बंगलाही खरेदी केला आहे.

टॅग्स :Americaअमेरिकाfraudधोकेबाजी