शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पन्नू हत्येचा कट भारतीय अधिकाऱ्याने रचला! अमेरिकेचा आरोप; हल्लेखोरांना सुपारी दिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 14:57 IST

न्यूयॉर्क शहरातील न्यायालयात यासंदर्भात सरकारने युक्तिवादात हा दावा केला. पन्नू याची हत्या करण्यासाठी हल्लेखोरांना सुपारी देण्याबाबत तसेच मनी लाँड्रिंगप्रकरणी विकास यादवने महत्त्वाची भूमिका बजावली.

वॉशिंग्टन/न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आले असताना खलिस्तानवादी गुरुपतवंतसिंह पन्नू याच्या हत्येचा कट आखल्याचा आरोप त्या देशाने भारताच्या एका माजी अधिकाऱ्यावर ठेवला आहे. विकास यादव असे त्याचे नाव असून, तो भारताच्या कॅबिनेट सचिवालयात कार्यरत होता. त्या सचिवालयाचा भारताच्या रॉ या गुप्तहेर संघटनेशी निकटचा संबंध आहे, असेही अमेरिकेने म्हटले आहे. 

न्यूयॉर्क शहरातील न्यायालयात यासंदर्भात सरकारने युक्तिवादात हा दावा केला. पन्नू याची हत्या करण्यासाठी हल्लेखोरांना सुपारी देण्याबाबत तसेच मनी लाँड्रिंगप्रकरणी विकास यादवने महत्त्वाची भूमिका बजावली. पण हत्येचा कट अयशस्वी ठरला असे अमेरिकेने म्हटले.  पन्नूच्या हत्येच्या कटात सहभागी आणखी एक आरोपी निखिल गुप्ता याला झेक रिपब्लिक या देशात अटक करण्यात आली. अमेरिकेच्या भूमीवर आमच्या नागरिकांच्या हत्येचा कट आखून कारवाया करण्याचे प्रयत्न खपवून घेता कामा नये, असे ॲटर्नी जनरल मेरिक बी. गारलँड यांनी म्हटले आहे.

हत्या कटात सहभागाचा भारताकडून इन्कार- खलिस्तानवादी गुरुपतवंतसिंग पन्नू याची अमेरिकेत हत्या करण्याच्या कटात आमचा काहीही सहभाग नाही असे भारताने ठामपणे अमेरिकेला सांगितले आहे. - याप्रकरणी चौकशी करण्यासाठी भारताने एक समिती नेमली आहे. भारत देत असलेल्या सहकार्याबद्दल अमेरिकेने समाधान व्यक्त केले आहे. 

टॅग्स :AmericaअमेरिकाIndiaभारत