शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 00:45 IST

Donald Trump US Qatar Agreement : ट्रम्प यांची कतारला सुरक्षेची हमी देणाऱ्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी

Donald Trump US Qatar Agreement : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या आंतरराष्ट्रीय राजकारणात प्रचंड सक्रीय झाले आहेत. दोहामध्ये हमास नेत्यांना लक्ष्य करून करण्यात आलेल्या हल्ल्याबद्दल ट्रम्प यांनी आधी इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कतारची माफी मागण्यास भाग पाडले. आणि आता ट्रम्प यांनी नेतन्याहू यांना कडक शब्दांत इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी कतारच्या सुरक्षेची हमी देणाऱ्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे. आदेशात म्हटले आहे की जर कोणत्याही देशाने कतार किंवा दोहा शहरावर हल्ला केला तर अमेरिका गरज पडल्यास लष्करी कारवाई करेल. इस्रायलच्या अलिकडच्या हवाई हल्ल्यानंतर आणि व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान नेतन्याहू यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर ही करार करण्यात आला.

अमेरिका-कतार दीर्घकालीन मित्र

ट्रम्प प्रशासनाने जारी केलेल्या आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे की, अमेरिका आणि कतार हे दीर्घकालीन मित्र आहेत. अमेरिकेच्या लष्करी अभ्यासापासून ते प्रादेशिक शांतता प्रयत्नांपर्यंत प्रत्येक गोष्टीत कतारने नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हमासला लक्ष्य करण्यासाठी इस्रायलने दोहावर केलेल्या हवाई हल्ल्याचा अमेरिका आणि कतार दोघांनीही तीव्र निषेध केला. या कार्यकारी आदेशानंतर काही आठवड्यांनंतर करारावर स्वाक्षरी झाली.

बाहेरील आक्रमणापासून अमेरिका करणार कतारचे संरक्षण

आदेशात असेही म्हटले आहे की, अमेरिका कतारची प्रादेशिक अखंडता आणि सुरक्षितता बाहेरील आक्रमणांपासून वाचवण्यासाठी वचनबद्ध आहे. दोन्ही देशांमधील दशकांपासून सुरू असलेली भागीदारी आणि सुरक्षा सहकार्य लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. ट्रम्प यांच्या आदेशात असेही म्हटले आहे की, अमेरिका कतारवरील कोणताही सशस्त्र हल्ला हा अमेरिकेच्या सुरक्षेसाठी आणि शांततेसाठी धोका मानेल. अशा परिस्थितीत, अमेरिका राजकीय, आर्थिक आणि गरज पडल्यास लष्करी कारवाई करेल.

या आदेशात असेही स्पष्ट करण्यात आले आहे की, अमेरिकेचे युद्ध सचिव, परराष्ट्र सचिव आणि राष्ट्रीय गुप्तचर संचालक कोणत्याही परकीय हल्ल्याला जलद प्रतिसाद देण्यासाठी कतारसोबत संयुक्त योजना विकसित करत राहतील. शिवाय, परराष्ट्र सचिव इतर मित्र राष्ट्रांच्या सहकार्याने कतारला सुरक्षा देण्यास प्रयत्नशील व कटिबद्ध असतील.

English
हिंदी सारांश
Web Title : Qatar attack equals US attack: Trump warns Israel sharply.

Web Summary : Trump warned Israel after its Qatar strike. US guarantees Qatar's security; any attack will be considered an attack on America, prompting potential military action. US committed to Qatar's defense.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहूQatarकतारIsraelइस्रायलAmericaअमेरिका