शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन भेटीनंतर एका अमेरिकन नागरिकाला मिळाले १९ लाखांचे गिफ्ट; नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 13:45 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील अलास्का येथील शिखर बैठक कोणत्याही ठोस निष्कर्षांविना संपली असली तरी, एका माजी अग्निशमन दलाच्या निरीक्षकासाठी ही बैठक नशीब बदलणारी ठरली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील अलास्का येथील शिखर बैठक कोणत्याही ठोस निष्कर्षांविना संपली असली तरी, एका माजी अग्निशमन दलाच्या निरीक्षकासाठी ही बैठक नशीब बदलणारी ठरली आहे. अँकोरेजचे रहिवासी असलेले मार्क वॉरेन यांना रशियन सरकारने तब्बल १९ लाख रुपयांची नवीकोरी मोटारसायकल भेट दिली आहे.

नेमकं काय घडलं?मार्क वॉरेन, जे अँकोरेजमध्ये फायर इंस्पेक्टर म्हणून निवृत्त झाले आहेत, त्यांच्याकडे 'Ural' कंपनीची एक जुनी मोटारसायकल आहे. ही बाईक मूळची रशियन बनावटीची आहे. अलीकडेच एका रशियन टीव्ही चॅनेलने वॉरेन यांची मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, त्यांच्या जुन्या बाईकसाठी सुटे भाग मिळवणे किती कठीण आहे. ही मुलाखत रशियामध्ये प्रचंड व्हायरल झाली आणि या घटनेने अनपेक्षित वळण घेतलं.

सरकारकडून अनोखी भेट१३ ऑगस्ट रोजी, म्हणजेच अमेरिका-रशिया शिखर बैठकीच्या दोन दिवस आधी, वॉरेन यांना एका रशियन पत्रकाराचा फोन आला. रशियन सरकारने त्यांना नवी मोटारसायकल भेट देण्याचा निर्णय घेतल्याचं त्याला सांगण्यात आलं. सुरुवातीला वॉरेन यांना हा एक प्रकारचा विनोद वाटला, पण शिखर बैठकीनंतर त्यांना खरी माहिती मिळाली. ही भेट खरोखरच अँकोरेजला पोहोचली होती.

हॉटेल पार्किंगमध्ये मिळालं सरप्राईजवॉरेन त्यांच्या पत्नीसह हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा पार्किंगमध्ये सहा रशियन नागरिक उभे होते. त्यांच्यासोबत एक चकचकीत, ऑलिव्ह-ग्रीन रंगाची 'Ural Gear Up' मोटारसायकल उभी होती. तिची किंमत सुमारे २२,००० डॉलर म्हणजेच जवळपास १९ लाख रुपये आहे. भेट देणाऱ्यांनी फक्त एकच विनंती केली, की त्यांनी फोटो काढण्याची आणि एक छोटी मुलाखत देण्याची परवानगी द्यावी. वॉरेन यांनी कॅमेऱ्यासमोर गाडी चालवून दाखवली, तेव्हा कॅमेरामॅन धावत त्यांचे व्हिडीओ रेकॉर्ड करत होते.

२४ तासांत भेट पोहोचली!या अनोख्या भेटीने वॉरेन खूप आनंदी आहेत, पण त्यांच्या मनात एक भीतीही आहे. "मला भीती वाटते की लोक मला रशियासोबत जोडून पाहतील. माझ्या कुटुंबाला कोणत्याही अडचणीत अडकवायचं नाहीये," असं ते म्हणाले. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, ही बाईक १२ ऑगस्ट रोजी तयार झाली आणि फक्त २४ तासांच्या आत थेट अलास्कामध्ये पोहोचवण्यात आली. या संपूर्ण घटनेमुळे मार्क वॉरेन एका रात्रीत चर्चेचा विषय बनले आहेत.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पVladimir Putinव्लादिमीर पुतिनAmericaअमेरिकाrussiaरशिया