मागील काही दिवसांपासून बांगलादेशात गोंधळ सुरू आहे. हिंदू तरुणांची हत्या झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. राजबारी येथील हिंदू तरुणाच्या हत्येचा धर्माशी कोणताही संबंध नसल्याचे युनूस सरकारने म्हटले आहे. तो हिंदू तरुण प्रत्यक्षात पैसे उकळणारा गुंड होता, असा दावा सरकारने केला. त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, असंही सरकारने म्हटले आहे. "सरकार सर्व संबंधितांना जबाबदारीने वागण्याचे आवाहन करत दिशाभूल करणारी, चिथावणीखोर आणि सांप्रदायिक विधाने पसरवण्यापासून दूर राहण्यास सांगितले आहे.
कायदा आणि न्यायाचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. बांगलादेश हा सांप्रदायिक सौहार्दाचा देश आहे - या देशाची शांतता आणि स्थिरता नष्ट करण्याचा कोणताही प्रयत्न सरकार कठोरपणे दडपून टाकेल, असंही म्हटले आहे.
प्रत्यक्षात, बांगलादेशचे अंतरिम सरकार "कायद्याचे राज्य आणि न्याय" प्रस्थापित करण्यासाठी काहीही करत नाही. शेख हसीना सरकार, अवामी लीग सरकारच्या पतनानंतर, बांगलादेशमध्ये हिंसाचार वाढला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती देखील बिघडली आहे. हिंदूंसह अल्पसंख्याकांना वाढत्या गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, बुधवारी राजबाडीमध्ये अमृत मंडल या हिंदू तरुणाची मारहाण करून हत्या करण्यात आल्याचे आरोप समोर आले आहेत.
लिंचिंग घटनेचा निषेध करण्यात आला असला तरी, नोबेल पारितोषिक विजेते युनूस सरकार यांच्या सरकारने प्रामुख्याने "दिशाभूल करणारी माहिती पसरवण्यावर" लक्ष केंद्रित केले आहे. "राजबारीतील पांगशा थानार भागात बुधवारी रात्री घडलेल्या एका दुःखद हत्येबद्दल सोशल मीडिया आणि विविध माध्यमे दिशाभूल करणारी माहिती पसरवत असल्याचे सरकारच्या लक्षात आले आहे, असे सरकारी निवेदनात म्हटले आहे.
Web Summary : Bangladesh government denies religious motive in Hindu youth's murder, calling him a criminal. Violence rises post-Awami League; minorities face threats. Government urges responsible reporting amid misinformation.
Web Summary : बांग्लादेश सरकार ने हिंदू युवक की हत्या में धार्मिक मकसद से इनकार किया, उसे अपराधी बताया। अवामी लीग के बाद हिंसा बढ़ी; अल्पसंख्यकों को खतरे। सरकार ने गलत सूचनाओं के बीच जिम्मेदार रिपोर्टिंग का आग्रह किया।